10-11-21! अखेर राजकुमार राव व पत्रलेखाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 10:22 AM2021-10-31T10:22:51+5:302021-10-31T10:26:52+5:30

Rajkummar Rao Patralekha Wedding : राजकुमार राव व पत्रलेखाची लव्हस्टोरी जगापेक्षा न्यारी...

Rajkummar Rao marrying Patralekhaa on November 10-11-12 | 10-11-21! अखेर राजकुमार राव व पत्रलेखाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!!

10-11-21! अखेर राजकुमार राव व पत्रलेखाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!!

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन सुरू झालंय, असं म्हणायला हरकत नाही. कतरिना कैफ व विकी कौशल लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. रणबीर कपूर व आलिया भट यांच्या लग्नाचीही जोरदार चर्चा आहे. आता अभिनेता राजकुमार राव  (Rajkummar Rao) व अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha)  हेही येत्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.

ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, राजकुमार व पत्रलेखा येत्या  नोव्हेंबरला महिन्यात लग्न करणार आहेत. 10, 11 किंवा 12 नोव्हेंबर यापैकी कोणत्याही एका तारखेला हे कपल लग्नबंधनात अडकू शकतं.  या लग्नात दोघांचे काही जवळचे मित्र व कुटुंबीय तेवढे सहभागी होणार आहेत.कपलनं काही जवळच्या व्यक्तिंना या लग्नाचे निमंत्रण पाठवण्यास सुरूवात केली आहे.

पत्रलेखाचे खरं नाव अन्तिवा पॉल आहे. दोघेही सुमारे 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही कधीच आपलं नातं लपवलं नाही. दोघेही सोशल मीडियावर दोघेही आपले फोटो सर्रास शेअर करतात.

‘लव सेक्स और धोखा’ या सिनेमात राजकुमारला पाहून काय विचित्र मुलगा आहे, असं पत्रलेखाला वाटलं होतं. पण पुढे ती याच विचित्र मुलाच्या प्रेमात पडली. राजकुमार राव व पत्रलेखाची पहिली भेट झाली आणि या लव्हस्टोरीची खरी सुरुवात झाली. पत्रलेखाला पाहताच लग्न करेन तर हिच्याशीच असं राजकुमारने मनात ठरवून टाकलं होतं.

 प्रेमात पडले तेव्हा राजकुमार व पत्रलेखा दोघेही स्ट्रगल करत होते. राजकुमार जवळ सध्यासारखा पैसा नव्हता. तरीही राजकुमारने पत्रलेखाला एक महागडी बॅग गिफ्ट केली होती. एका विदेश प्रवासात तिची ही बॅग नेमकी चोरीला गेली. ती प्रचंड दु:खी झाली आणि तिने राजकुमारला ही गोष्ट सांगितली. पण ती विदेशातून घरी परतली तेव्हा घरात अगदी तशीच एक बॅग तिला दिसली.
 एकदा राजकुमार पत्रलेखाला भेटायला जाणार होता. पण तो ट्रॅफिक जॅममध्ये अडकला. मग काय, त्याने तिथेच गाडी थांबवली आणि पायी जुहूकडे धावत सुटला. पत्रलेखासाठी हा इमोशनल क्षण होता. पत्रलेखाने हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 

Web Title: Rajkummar Rao marrying Patralekhaa on November 10-11-12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.