राजकुमार रावच्या अभिनयाने सजलेला 'श्रीकांत' ओटीटीवर रिलीज होणार; कधी? कुठे? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 01:27 PM2024-07-04T13:27:32+5:302024-07-04T13:28:45+5:30

राजकुमार रावचा आगामी 'श्रीकांत' सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झालाय. बातमीवर क्लिक करुन सविस्तर वाचा

Rajkummar Rao starrer Srikanth movie to release on OTT netflix from 5 july | राजकुमार रावच्या अभिनयाने सजलेला 'श्रीकांत' ओटीटीवर रिलीज होणार; कधी? कुठे? वाचा सविस्तर

राजकुमार रावच्या अभिनयाने सजलेला 'श्रीकांत' ओटीटीवर रिलीज होणार; कधी? कुठे? वाचा सविस्तर

यावर्षी  एका सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. तो म्हणजे 'श्रीकांत' सिनेमा. 'श्रीकांत' सिनेमात राजकुमार रावची प्रमुख भूमिका होती. याशिवाय मराठमोळे अभिनेते भरत जाधव आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री ज्योतिका हे कलाकार सुद्धा 'श्रीकांत' मध्ये पहायला मिळाले. 'श्रीकांत'ला थिएटरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. तरीही राजकुमारच्या अभिनयाचं कौतुक झालं. सत्य घटनेवर आधारीत हा प्रेरणादायी सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.

या ठिकाणी पाहायला मिळणार 'श्रीकांत'

थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी 'श्रीकांत' OTT प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राजकुमार राव स्टारर सिनेमा उद्या म्हणजेच 5 जुलै 2024 रोजी नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल रिलीज होईल. सिनेमाचा प्रीमियर आज रात्री 12 वाजता किंवा उद्या संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये  'श्रीकांत'  पाहता आला नाही त्यांना घरबसल्या या सिनेमाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.

'श्रीकांत'  सिनेमाविषयी..

राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला  'श्रीकांत'  हा बायोपिक बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि दृष्टिहीन उद्योजक श्रीकांत बोला यांची प्रेरणादायी कथा सांगतो. तुषार हिरानंदानी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ज्यात राजकुमार राव सोबत ज्योतिका, अलाया एफ, भरत जाधव आणि शरद केळकर यांच्याही भूमिका आहेत. १० मे २०२४ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालेला. आता दोन महिन्यांनंतर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर घरबसल्या पाहता येईल. 

Web Title: Rajkummar Rao starrer Srikanth movie to release on OTT netflix from 5 july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.