बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 01:00 PM2023-12-12T13:00:35+5:302023-12-12T17:24:23+5:30
थलायवा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेली रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे रजनीकांत (rajinikanth). थलायवा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेली रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. तेलुगू, तामिळ, हिंदी, मल्याळम अशा अनेक भाषिक चित्रपटांमध्ये रजनीकांत यांनी काम केलं आहे. थलायवी या नावाने खासकरुन ओळख निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देवासमान मानलं जातं. आज त्याच रजनीकांत यांचा ७३ वा वाढदिवस. १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगलोर येथे जन्म झालेल्या रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड. सिनेमात येण्यापूर्वी ते बंगळुरूमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत होते. दिग्दर्शक के बालचंदरने शिवाजी राव यांना बंगळुरूच्या भेटीत पाहिले आणि त्यांना त्यांच्या चित्रपटात संधी दिली. त्यांनीच शिवाजी राव यांना रजनीकांत बनण्यास प्रेरित केले. 'अपूर्व रागंगल' या चित्रपटाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
रजनीकांत यांना त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केवळ 2000 रुपये देण्यात आले होते. मात्र आजच्या घडीला रजनीकांत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच रजनीकांत यांची एकूण संपत्ती किती ते जाणून घेऊयात.
Financial Express च्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४३० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. रजनीकांत साधारणपणे त्याच्या एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन स्वीकारतात. रजनीकांत यांचं चेन्नईमध्ये मोठं आलिशान घर असून हे घर २००२ मध्ये बांधण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, या घरासाठी प्रचंड खर्च करण्यात आला होता. रजनीकांत यांना गाड्यांची विशेष आवड आहे. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये अनेक लक्झरी गाड्या आहेत. यात Toyota Innova, Range Rover, Bently अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे.