Raju Srivastava यांच्या आठवणीत लेक अंतरा झाली भावुक, वडिलाच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 12:36 PM2022-09-23T12:36:31+5:302022-09-23T12:36:59+5:30

Raju Srivastava : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात कॉमेडियनने अखेरचा श्वास घेतला.

Raju Srivastava's memory of daughter Antara is emotional, reacting for the first time after his father's death | Raju Srivastava यांच्या आठवणीत लेक अंतरा झाली भावुक, वडिलाच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Raju Srivastava यांच्या आठवणीत लेक अंतरा झाली भावुक, वडिलाच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

googlenewsNext

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी सकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयात कॉमेडियनने अखेरचा श्वास घेतला. राजू यांची जवळपास ४० दिवस मृत्यूशी झुंज देत होते.  त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत होते. पण राजू श्रीवास्तव यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, राजूच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्यांची मुलगी अंतरा हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.

राजू श्रीवास्तव गुरूवारी पंचतत्त्वात विलीन झाले. दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साश्रू नयनांनी सर्वांनी त्यांना निरोप दिला. दरम्यान, वडिलांच्या निधनानंतर राजूची मुलगी अंतरा हिने पहिल्यांदाच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत त्याने राजूच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत.


अंतराने बुधवारी रात्री उशिरा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले. इंस्टा स्टोरीवर तिने राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त करणाऱ्या सर्वांची छायाचित्रे शेअर केली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपल्या वडिलांना मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल लोकांचे आभार व्यक्त करत अंतराने या पोस्ट शेअर केल्या आहेत. अंतरा राजू यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून सतत चाहत्यांना त्यांच्या हेल्थ संबंधित अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत होती.


१० ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव अचानक बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर ते ४१ दिवस व्हेंटिलेटरवर होते. मात्र बुधवारी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. राजू यांच्या निधनामुळे विनोदी जगतावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Raju Srivastava's memory of daughter Antara is emotional, reacting for the first time after his father's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.