अरूण जेटलींच्या निधनावर राखी सावंत बरळली; म्हणे, माझ्याकडे दैवी शक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 02:29 PM2019-08-25T14:29:09+5:302019-08-25T14:30:03+5:30

ड्रामा क्विन राखी सावंत एक वेगळाच व्हिडीओ शेअर करून टीकेची धनी ठरली आहे. या व्हिडीओमुळे ती प्रचंड ट्रोल होतेय.

rakhi sawant on arun jaitley death she predicted his passing away 10 days before | अरूण जेटलींच्या निधनावर राखी सावंत बरळली; म्हणे, माझ्याकडे दैवी शक्ती

अरूण जेटलींच्या निधनावर राखी सावंत बरळली; म्हणे, माझ्याकडे दैवी शक्ती

googlenewsNext
ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात शोकाचे वातावरण आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. याचदरम्यान ड्रामा क्विन राखी सावंत एक वेगळाच व्हिडीओ शेअर करून टीकेची धनी ठरली आहे. या व्हिडीओमुळे ती प्रचंड ट्रोल होतेय.
या वादग्रस्त व्हिडीओमध्ये राखीने एक अजब दावा केला आहे. होय, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. त्यामुळे जेटलींच्या निधनाबद्दल मला दहा दिवसांपूर्वीच माहित होते, असे तिने म्हटले आहे.

या व्हिडीओ ती म्हणते, ‘जेटलीजी भाजपाचे नेते आहेत. ते आज आपल्यात नाहीत. मी एक आठवड्यापूर्वी नव्हे दहा दिवसांपूर्वीच हे म्हटले होते. मला कधी कधी स्वप्न येतात आणि मला भविष्यात घडणा-या अनेक गोष्टी आधीच माहित होतात. कसे माहित नाही, पण ही दैवी शक्ती आहे. मला ही दैवी शक्ती दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार. जेटलींच्या आत्म्याला शांती मिळो, इतकेच मी म्हणेल. जेटलींच्या ‘पोटली’तून चांगले चांगले बजेट निघाले. देश त्यांना स्मरणात ठेवेल.’


जेटलींच्या निधनाशिवाय ती या व्हिडीओत आणखीही बरेच बरळली. ‘जगात आपण ना काही घेऊन आलोत, ना काही घेऊन जाणार. त्यामुळे कधीही कुणाचे वाईट करू नका, वाईट चिंतू नका. जमेल तितके चांगले करा. देशाच्या भल्याचा विचार करा. शेजाराचे भले चिंता. कुटुंबाचे भले करा. स्वत:चे आईवडिल, सासू सासरे सगळ्यांची सेवा करा. कारण आयुष्य एकदाच मिळते,’ असेही तिने म्हटले आहे.
राखीने हा व्हिडीओ शेअर करताना लोकांनी तिला फैलावर घेतले. अनेकांनी तिला ट्रोल केले. गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Web Title: rakhi sawant on arun jaitley death she predicted his passing away 10 days before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.