Rakhi Sawant VIDEO : -अन् स्टेजवरच जोरजोरात रडू लागली राखी सावंत, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:23 PM2023-03-12T18:23:07+5:302023-03-12T18:24:06+5:30
Rakhi Sawant VIDEO : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Rakhi Sawant VIDEO : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अशात नुकतंच तिचं झूठा नावाचं गाणं लॉन्च झालं. हे गाणं राखीच्या खासगी आयुष्यावर बेतलेलं आहे. गेल्या काही दिवसांत राखीने जे काही सोसलं, ते या गाण्यात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये राखी ढसाढसा रडताना दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
व्हिडीओत राखी स्टेजवर उभी आहे. यावेळी बोलताना अचानक ती भावुक होते आणि जोरजोरात रडायला लागते. राखी सावंत हिला कोणीच फसवू शकत नाही, असं लोक म्हणत आहेत. का राखी सावंतकडे हृदय नाही का? राखी सावंत सुखी संसाराचं स्वप्न पाहू शकत नाही का? राखी सावंत माणूस नाहीये का? असं ती म्हणते आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. ती रडत रडत खाली बसते. स्टेजवर तिच्यासोबतचे तिचे सहकारी तिला सावरताना दिसतात.
राखी सावंतच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. नेहमीप्रमाणे काहींनी तिची बाजू घेतली आहे तर काहींना तिला ट्रोल केलं आहे. मला खरोखरच आता राखी सावंत हिच्याबद्दल वाईट वाटतंय, असं एका युजरने लिहिलं आहे. तर काही नाही ही फक्त ड्रामा करतेय, असं एकाने लिहिलं आहे.
गेल्या काही दिवसांत राखीच्या संसारात वादळ आलं आहे. राखी सावंतने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीने आदिलविरुद्ध मारहाणीची तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. आता हा वाद थेट कोर्टात पोहचलाय. आदिल दुर्रानी हा गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहे. राखी बिग बॉस मराठी ४ मधून बाहेर पडली आणि अचानक तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. राखी व तिचा बॉयफ्रेन्ड आदिल खान दुर्रानी यांनी निकाह केल्याचं समोर येताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मी व आदिलने सात महिन्यांपूर्वीच निकाह केल्याचं राखीने स्पष्ट केलं होतं. यानंतर महिना होत नाही तोच राखीने आदिलविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.