बॉम्ब बांधून मला पाकिस्तानात फेका! राखी सावंत पुन्हा बरळली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 01:49 PM2019-03-01T13:49:39+5:302019-03-01T13:56:01+5:30

होय, आपल्या विधानांनी रोज नवे वाद ओढवून घेणारी आणि फुकटच्या लोकप्रियतेसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारी राखी आता पाकिस्तानविरोधात सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे.

rakhi sawant said that she can even die for india if needed | बॉम्ब बांधून मला पाकिस्तानात फेका! राखी सावंत पुन्हा बरळली!!

बॉम्ब बांधून मला पाकिस्तानात फेका! राखी सावंत पुन्हा बरळली!!

googlenewsNext
ठळक मुद्देराखी आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे जवळचे नाते आहे. अलीकडे तनुश्री दत्ताच्या प्रकरणामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. 

भारत- पाकिस्तान सीमेवर तणावाची स्थिती असताना, कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत हिने  वेगळाच सूर लावला आहे. होय, आपल्या विधानांनी रोज नवे वाद ओढवून घेणारी आणि फुकटच्या लोकप्रियतेसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारी राखी आता पाकिस्तानविरोधात सीमेवर लढण्यासाठी सज्ज आहे. होय, अलीकडे राखी एका इव्हेंटसाठी लुधियानाला पोहोचली. ग्रेट खली हाही या इव्हेंटला हजर होता. या इव्हेंटमध्ये बोलताना राखीने प्रसंगी देशासाठी जीव द्यायलाही तयार असल्याचे म्हटले. देशहितासाठी मी काहीही करायला तयार आहे. गरज पडली तर शरीरावर २ हजार बॉम्ब लावून हेलिकॉप्टरमधून पाकिस्तानात उडी घ्यायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, असे राखी म्हणाली.


यापूर्वी राखीने पाकिस्तानला धमकी देणारा व्हिडिओ शेअर केला होता. ‘पाकिस्तान वालों तुमने जो हमारे पायलट को पकडा है, उसे छोड दो. अगर राखी सावंत को ज्यादा गुस्सा आ गया तो राखी सावंत तुम्हारे पाकिस्तान में आ जाएगी,’ असे राखीने या व्हिडिओत म्हटले होते.
राखी सावंतने १९९७मध्ये ‘अग्निचक्र’ या चित्रपटाद्वारे करियरला सुरुवात केली होती. यानंतर अनेक चित्रपटांत तिने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँगही केलेत. पुढे आयटम गर्ल अशीच तिची ओळख आहे.  बिग बॉस, ये है जलवा, नच बलिये, अरे दिवानों मुझे पहचानो, राखी का स्वयंवर यांसारख्या रिअ‍ॅलिटी शो मध्येही ती झकळली. राखी आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे जवळचे नाते आहे. अलीकडे तनुश्री दत्ताच्या प्रकरणामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. 

Web Title: rakhi sawant said that she can even die for india if needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.