जमिनीवर बसून रडत होती राखी, आईच्या शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ केला शेअर; जॅकी श्रॉफनेही केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 09:36 AM2023-01-29T09:36:28+5:302023-01-29T09:38:15+5:30

राखीची आई रुग्णालयातील बेडवर अखेरच्या घटका मोजत होती, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

rakhi sawant shared video of her mother taking last breath rakhi burst into tears | जमिनीवर बसून रडत होती राखी, आईच्या शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ केला शेअर; जॅकी श्रॉफनेही केली कमेंट

जमिनीवर बसून रडत होती राखी, आईच्या शेवटच्या क्षणाचा व्हिडिओ केला शेअर; जॅकी श्रॉफनेही केली कमेंट

googlenewsNext

राखी सावंत या अभिनेत्रीला आपण नेहमीच ड्रामा आणि नौटंकी अंदाजातचच पाहिलं आहे. मात्र काल रात्री राखीच्या आयुष्यात वादळच आलं. राखीची आई जया सावंत यांची ब्रेन ट्युमरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

राखीची आई रुग्णालयातील बेडवर अखेरच्या घटका मोजत होती, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तर राखी बाजूला जमिनीवर बसून अक्षरश: विव्हळत होती. हा व्हिडिओ राखीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. राखी म्हणते, आज आईचा हात डोक्यावरुन कायमचा उठला.आता माझ्याजवळ हरण्यासारखे काहीच नाही राहिले. आय लव्ह यू मॉं, तुझ्याशिवाय काहीच नाही राहिले. आता मी कोणाला हाक मारु, मला कोण मिठीत घेईल, आता मी काय करु, कुठे जाऊ, आई तुझी आठवण येते.'

राखीचा हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी राखीच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. तिला धीर दिला आहे. अभिनेता जॅकी श्रॉफनेही राखीच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. ते म्हणाले, 'मी तुझं दु:ख समजू शकतो. मी आई वडील आणि भाऊ तिघांना गमावले आहे. पण ते नेहमी आपल्यात असतात.'

अंबानींनी केली होती उपचारासाठी मदत

दरम्यान आईच्या उपचारासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी मदत करत आहेत असं राखीने काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर सांगितले होते. तसेच राखीने बिग बॉस मराठी मध्ये सहभाग घेत टॉप ४ पर्यंत मजल मारली होती. फिनालेच्या दिवशी ती ९ लाख रुपये स्वीकारत स्पर्धेतून बाहेर पडली होती. आईच्या उपचारासाठी तिने हे पैसे स्वीकारले होते. 

Web Title: rakhi sawant shared video of her mother taking last breath rakhi burst into tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.