Rakshabandhan special : सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?,जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 07:00 AM2021-08-22T07:00:00+5:302021-08-22T07:00:00+5:30

रक्षाबंधनच्या निमित्ताने आज आपण सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत. फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहित आहे.

Rakshabandhan special : Did you see Siddharth Chandekar's sister? Find out about her | Rakshabandhan special : सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?,जाणून घ्या तिच्याबद्दल

Rakshabandhan special : सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?,जाणून घ्या तिच्याबद्दल

googlenewsNext

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या सिद्धार्थ ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करतो आहे. या मालिकेत तो स्‍वराजची भूमिका साकारतो आहे. रक्षाबंधनच्या निमित्ताने आज आपण सिद्धार्थ चांदेकरच्या सख्ख्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत. फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहित आहे. 

सिद्धार्थ चांदेकरचा जन्म १९९१ साली झाला आहे. सध्या तो तीस वर्षाचा आहे. सिद्धार्थ चांदेकर याने आजवर अनेक मराठी मध्ये चांगले चांगले चित्रपट केले आहेत. अवधूत गुप्ते यांच्या झेंडा या चित्रपटातून देखील सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. २०१० मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट खूप गाजला होता.


सिद्धार्थ चांदेकर याच्या बहिणीचे नाव सुमेधा असे आहे. काही वर्षापूर्वीच तिचे लग्न झालेले आहे. सुमेधाच्या पतीचे नाव अनुप क्षीरसागर असे आहे.

सिद्धार्थ याचे काही दिवसांपूर्वी मिताली सोबत लग्न झाले होते. त्यावेळेस सुमेधा हिने सिद्धार्थ याला चांगले तयार केले होते. या वेळी अनुप क्षीरसागर हे देखील सहभागी झाले होते.

सुमेधा ही आकांक्षा फाउंडेशनमध्ये सिनियर असोसिएट म्हणून काम करते. तसेच तिने पुण्यातील मॉडर्न कॉलेज मधून शिक्षिकेची नोकरी देखील काही वर्षापूर्वी केली होती.


सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकरदेखील अभिनेत्री आहेत. सिद्धार्थ आणि त्याच्या आईने जीवलगा मालिकेत एकत्र काम केले होते. 

Web Title: Rakshabandhan special : Did you see Siddharth Chandekar's sister? Find out about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.