सासुरवाडीत रकुल प्रित सिंहने बनवला पहिला पदार्थ; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:10 PM2024-02-25T12:10:13+5:302024-02-25T12:13:44+5:30
नवविवाहित अभिनेत्री रकुल प्रित सिंगआणि जॅकी भगनानी हे गोवावरून मुंबईला परतले. मुंबईला परतल्यानंतर रकुलने सासुरवाडीत पहिला पदार्थ बनविला आहे. ...
नवविवाहित अभिनेत्री रकुल प्रित सिंगआणि जॅकी भगनानी हे गोवावरून मुंबईला परतले. मुंबईला परतल्यानंतर रकुलने सासुरवाडीत पहिला पदार्थ बनविला आहे. या पदार्थाचा फोटो तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. रकुलने लग्नानंतर तिचा इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल फोटोसुद्धा बदलला आहे. लग्नसोहळ्यातील जॅकीसोबतचा फोटो तिने आता प्रोफाइलवर ठेवला आहे. लग्नानंतर सून तिच्या कुटुंबीयांसाठी पहिला पदार्थ काहीतरी गोड बनवते. रकुलनेसुद्धा ही परंपरा पाळत सासरच्यांसाठी गोड पदार्थ बनविला आहे.
रकुलकडे या विधीला 'चौका चारधाना' असं म्हटलं जात. रकुल आणि जॅकी नुकतेच गोव्यावरुन मुंबईत परतले आहेत. लग्नानंतरच्या ज्या काही प्रथा असतात त्या आता केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रकुलने जॅकीसाठी शिरा बनवला. एकंदरीत आता रकुल-जॅकीच्या संसाराला सुरुवात झाली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून बीटाउनमध्ये ज्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर ते लग्न 21 फेब्रुवारी रोजी पार पडलं. बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड लग्न गोव्यामध्ये झालं. लग्नानंतर रकुल आणि जॅकीने आपल्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या या नवीन प्रवासाबद्दल सर्वांना सांगितलं होतं. अर्थात त्यांच्या लग्नाच्या आणि अफेयरच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरु होत्या, मात्र त्या दोघांनी कधीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती.