लग्नातील डिझायनर लेहंग्यामुळे रकुल प्रीत झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी केली अथिया शेट्टीसोबत तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 04:30 PM2024-02-22T16:30:22+5:302024-02-22T16:30:52+5:30
Rakul preet wedding lehenga: रकुलने तिच्या लग्नात हेवी डिझाइन असलेला पेस्टल शेडचा लेहंगा परिधान केला. मात्र, तिच्या आणि अथियाच्या लेहंग्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (rakul-preet singh) आणि जॅकी भगनानी या न्यूली मॅरीड कपलची चर्चा रंगली आहे. मोठ्या धुमधडाक्यात या जोडीने २१ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. या लग्नाची शोभा वाढवण्यासाठी कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे हा लग्नसोहळा सध्या विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. परंतु, या आनंदाच्या वातावरणामध्ये नेटकऱ्यांनी रकुल प्रीतला ट्रोल केलं आहे. या लग्नात रकुलने अभिनेत्री अथिया शेट्टीला कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या सोशल मीडियावर रकुल आणि जॅकी यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्येच रकुलच्या डिझायनर लेहंगा आणि हेवी ज्युलरीदेखील चर्चेचा विषय ठरत आहे. यात रकुलने जे दागीने आणि जो लेहंगा निवडला तो बऱ्यापैकी अथिया शेट्टीसारखा आहे. अथियानेही तिच्या लग्नात सेम पेस्टल शेडचा लेहंगा आणि हेवी ज्युलरी परिधान केली होती. त्यामुळे रकुलने अथियाला कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.
नेमकं काय म्हणाले नेटकरी?
'रकुल आणि अथियाच्या लेहंग्याच्या डिझाइनमध्ये फारसा फरक नाहीये. जवळपास सारखेच वाटतायेत', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'फक्त बॉलिवूड अभिनेत्रीच एकमेकांचे वेडिंग ड्रेस कॉपी करतात. नाही तर खऱ्या आयुष्यात मुली लग्नात फक्त लाल रंगाचेच कपडे परिधान करतात', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, रकुलने २१ फेब्रुवारीला गोव्यात प्रसिद्ध निर्माता, अभिनेता जॅकी भगनानी याच्यासोबत लग्न केलं. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने लग्न केलं. या लग्नसोहळ्याला कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.