अनवाणी फिरतोय राम चरण, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्येचं पालन, जाणून घ्या व्रताचे नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 12:42 PM2024-11-10T12:42:45+5:302024-11-10T12:44:13+5:30
रामचरणला याआधीही अनेकदा आपण अनवाणी पाहिले आहे.
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे राम चरण (ram charan). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या अभिनेत्याने साऊथसह संपूर्ण जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. सध्या राम चरण आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात राम चरण अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबर झळकणार आहे. अशातच आता राम चरणचा अनवाणी पायाने फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
नुकतंच हैदराबाद एअरपोर्टवर राम चरण स्पॉट झाला. यावेळी तो काळ्या कपड्यात अनवाणी होता. त्याच्या पायात चप्पल नव्हती. राम चरण अनवाणी असण्यामागे एक मोठं कारण आहे. रामचरण हा अयप्पा यांचा अनुयायी आहे. रामचरण आणि त्याचे कुटुंबीय अध्यात्मिक असून ते स्वामी अयप्पा यांची पूजाअर्चना करतात.
रामचरणला याआधीही अनेकदा आपण अनवाणी पाहिले आहे. राम चरण दरवर्षी अयप्पा दीक्षा (Ram Charan Ayyappa Deeksha) घेतो. ही ४१ दिवसांची दीक्षा असते आणि त्यानंतर केरळच्या शबरीमला मंदिरात जाऊन अयप्पा स्वामींचे दर्शन घ्यायचे असते. दरम्यान ४१ दिवस अनवाणी चालावे लागते, काळे कपडे घालावे लागतात, नामस्मरण करावे लागते आणि दर्शनापूर्वी केस किंवा दाढी कापता येत नाही.
राम चरण आणि कियारा अडवाणीचा आगामी 'गेम चेंजर' सिनेमा कधी रिलीज होणार याची रिलीज डेटही समोर आलीय. पुढील वर्षी संक्रांतीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या RRR सिनेमानंतर राम चरणच्या आगामी 'गेम चेंजर' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.