पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रामचरणने शेअर केला खास Video, लेक क्लीन काराचीही दिसली झलक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:00 AM2023-07-21T10:00:47+5:302023-07-21T10:01:33+5:30
कालच २० जुलै रोजी उपासनाने 34 वा वाढदिवस साजरा केला. त्यांची मुलगीही एक महिन्याची झाली आहे.
'आरआरआर' फेम अभिनेता रामचरण (Ram Charan) आणि पत्नी उपासना (Upasana Konidela) नुकतेच आई बाबा झाले आहेत. सध्या दोघेही आयुष्यातील या टप्प्याचा आनंद घेत आहेत. तर कालच २० जुलै रोजी उपासनाने 34 वा वाढदिवस साजरा केला. त्यांची मुलगीही एक महिन्याची झाली आहे. यानिमित्त डबल सेलिब्रेशन करण्यात आले असून रामचरणने पत्नीच्या वाढदिवसाला खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत लेकीची झलकही दिसते.
रामचरणने शेअर केलेल्या व्हिडिओत उपासना आणि त्याच्या आयुष्याचा पूर्ण प्रवास बघायला मिळतो. व्हिडिओत सुरुवातीला त्यांच्या लेकीच्या जन्माचा आनंद दिसत आहे. कुटुंबातील सर्व सदस्य जमा झाले आहेत आणि या नव्या पाहुण्याचं स्वागत करत आहेत. उपासनाही तिच्या प्रेग्नंसीविषयी बोलताना दिसत आहे. तसंच लग्नाला ११ वर्ष झाली तरी मूल नाही म्हणून तणाव होता असंही रामचरण कबूल करतो. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आमच्या मुलीला तिची वेळ मिळाली आणि आम्हाला पालकत्वाचा आनंद घेता आला.
हा व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. कारण व्हिडिओत सुपरस्टारची लेक मेगा प्रिन्सेस क्लिन काराचीही झलक दिसते. सगळेच या चिमुकलीभोवताली दिसतात. रामचरण एवढ्याशा जीवाला घेऊन ऑपरेशन थिएटरबाहेर येतो तेव्हा कुटुंबाला होणारा आनंद शब्दात न सांगता येणारा आहे.