अरेच्चा..! 'तेनाली रामा'मध्‍ये रामा दिसणार चक्क गाढवाला शिकवताना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 07:15 AM2019-02-07T07:15:00+5:302019-02-07T07:15:00+5:30

सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील रामा त्‍याची तल्‍लख बुद्धी व हुशारीसह विजयनगरमधील प्रत्‍येक समस्‍येचे निराकरण करत आहे

Rama attempts to educate a donkey on Sony SAB’s Tenali Rama | अरेच्चा..! 'तेनाली रामा'मध्‍ये रामा दिसणार चक्क गाढवाला शिकवताना

अरेच्चा..! 'तेनाली रामा'मध्‍ये रामा दिसणार चक्क गाढवाला शिकवताना

googlenewsNext

सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील रामा त्‍याची तल्‍लख बुद्धी व हुशारीसह विजयनगरमधील प्रत्‍येक समस्‍येचे निराकरण करत आहे. विजयनगरवर सत्‍ता मिळवण्‍याचा उद्देश असलेल्‍या सुल्‍तानने (शिवेंद्र) कृष्‍णदेवरायला दुखावण्‍यासाठी आणखी एक प्रयत्‍न केला आहे.


कृष्‍णदेवरायला (मानव गोहिल) ठार करण्‍याचा मागील कट फसल्‍यानंतर सुल्‍तान आणखी एका माणसाला म्‍हणजेच शरीफला (राम मेहेर) जादुई मणीच्‍या आव्‍हानासह दरबारात पाठवतो. हा मणी (हिरा) तयार करताना वापरण्‍यात आलेल्‍या साहित्‍यामध्‍ये विलक्षण बाब सामावलेली असते. या मणीला मानवाचा स्‍पर्श होताच तो २ तासांमध्‍ये विरघळून जातो. वेषांतर केलेला शरीफ भावनिक होऊन राजाला मणीची काळजी घेण्‍याची आणि तो त्‍याचे संरक्षण करू शकला नाही तर निदान त्‍यावर नजर ठेवण्‍याची विनंती करतो. कृष्‍णदेवरायचा रामावर विश्‍वास असल्‍यामुळे तो मणीची जबाबदारी रामाकडे (कृष्‍ण भारद्वाज) सोपवतो. दुसरीकडे सुल्‍तानने रामाला गाढवाला शिकवण्‍याच्‍या कामामध्‍ये व्‍यस्‍त ठेवले आहे. कारण त्‍याच्‍या उद्देशामध्‍ये अडथळा आणण्‍याची क्षमता रामामध्‍ये असते. अशा गोंधळाच्‍या स्थितीमध्‍ये रामा मणीच्‍या संरक्षणासोबतच कृष्‍णदेवरायला वाचवू शकेल का?
रामाची भूमिका साकारणारा कृष्‍ण भारद्वाज म्‍हणाला,' रामाकडे राजाला आणखी एका संकटातून वाचवण्‍याची मोठी जबाबदारी आहे. पण गाढवाला शिकवण्‍याच्‍या कामामुळे त्‍याचे याकडे दुर्लक्ष होते. प्रेक्षकांना अशा गोंधळाच्‍या स्थितीमध्‍ये अनेक विनोदी क्षण पाहायला मिळणार आहेत. या एपिसोडसाठी
गाढवासोबत शूटिंग करताना सर्व कलाकारांनी खूप मजा केली.' 
कृष्‍णदेवरायची भूमिका साकारणारा मानवी गोहिल म्‍हणाला,' मणीला वाचवण्‍याची जबाबदारी खूपच आव्‍हानात्‍मक आहे. कृष्‍णदेवरायला त्‍याच्‍या खास गुणाबाबत माहीत नसते. पण नेहमीप्रमाणे तो रामावर विश्‍वास ठेवतो. ते एकत्र कशाप्रकारे विजयनगरचे संरक्षण करतात हे पाहणे खूपच मजेशीर असेल. तेनाली रामाच्‍या संपूर्ण टीमसोबत काम करताना खूपच मजा येते. सर्वांमध्‍ये चांगले नाते आहे.'

Web Title: Rama attempts to educate a donkey on Sony SAB’s Tenali Rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.