रामाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अरुण गोविल अभिनयक्षेत्रापासून दूर राहून करतात हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 06:00 AM2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:01+5:30

अरुण गोविल यांनी रामायण या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले. पण प्रेक्षकांनी त्यांना रामाच्या भूमिकेशिवाय दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत स्वीकारले नाही.

Ramayan fame arun govil is worked as producer after quitting acting | रामाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अरुण गोविल अभिनयक्षेत्रापासून दूर राहून करतात हे काम

रामाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अरुण गोविल अभिनयक्षेत्रापासून दूर राहून करतात हे काम

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनयात मिळालेल्या अपयशानंतर अरुण गोविल निर्मिती क्षेत्राकडे वळले. त्यांनी रामायण या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिडीसोबत प्रोडक्शन हाऊस सुरू केले.

अरुण गोविल यांचा आज वाढदिवस असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पहेली या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सावन आने दो, जुदाई, हिम्मतवाला, कानून, हतकडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तसेच त्यांनी विक्रम बेताल या मालिकेत देखील काम केले. पण त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता रामायण या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेतील त्यांनी साकारलेली रामाची भूमिका चांगलीच गाजली.

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेला नव्वदाच्या दशकात लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका सुरू असताना रस्त्यावर एकही माणूस दिसायचा नाही अशी त्या काळी परिस्थिती होती. रामायण या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती. त्या दोघांनीही आपल्या भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या की, प्रेक्षक त्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडण्यासाठी जात असत. या मालिकेने या दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अरुण आणि दीपिका यांच्या दर्शनासाठी लोक रांगा लावत असत. तसेच त्यांच्या दर्शनासाठी येताना देवळात ज्याप्रकारे आपण हार, अगरबत्ती, नारळ घेऊन जातो, त्याप्रमाणे लोक घेऊन येत असत.

अरुण गोविल यांनी रामायण या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले. पण प्रेक्षकांच्या मनात त्यांनी साकारलेल्या रामाची छबी इतकी पक्की बसली होती की, त्यांनी अरुण यांना रामाच्या भूमिकेशिवाय दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत स्वीकारले नाही. आजही प्रेक्षक त्यांना राम या नावानेच ओळखतात असे ते अनेकवेळा त्यांच्या मुलाखतीत सांगतात. पण या छबीत अडकल्यामुळे त्यांना पुढील काळात अभिनयात यश मिळाले नाही. अभिनयात मिळालेल्या अपयशानंतर ते निर्मिती क्षेत्राकडे वळले. त्यांनी रामायण या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिडीसोबत प्रोडक्शन हाऊस सुरू केले. त्यांचे प्रोडक्शन हाऊस दूरदर्शनवरील मालिकांची निर्मिती करतं. ते सध्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रचंड व्यग्र आहेत.

अरुण गोविल यांचे लग्न श्रीलेखा या अभिनेत्रीसोबत झाले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी एका प्रसिद्ध कंपनीत कामाला असून त्यांचा मुलगा देखील अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे.

Web Title: Ramayan fame arun govil is worked as producer after quitting acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ramayanरामायण