Ramayan Serial : ‘रामायण’ मालिकेतील ‘या’ भागाने बनवला होता वर्ल्ड रेकॉर्ड, ‘लक्ष्मणा’ची खास पोस्ट....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 05:07 PM2023-04-16T17:07:50+5:302023-04-16T17:10:26+5:30

Ramayan Serial, Sunil Lahari Post : 1987 ते 1988 या काळात दूरदर्शनवर रामायण या मालिकेचं प्रसारण झालं. 78 भागांमध्ये चाललेली ही मालिका दर रविवारी सकाळी प्रसारित व्हायची आणि या काळात सगळे रस्ते ओस पडायचे.

Ramayan Serial Made World Record Of Viewership Sunil Lahari Shared post | Ramayan Serial : ‘रामायण’ मालिकेतील ‘या’ भागाने बनवला होता वर्ल्ड रेकॉर्ड, ‘लक्ष्मणा’ची खास पोस्ट....

Ramayan Serial : ‘रामायण’ मालिकेतील ‘या’ भागाने बनवला होता वर्ल्ड रेकॉर्ड, ‘लक्ष्मणा’ची खास पोस्ट....

googlenewsNext

Ramayan Serial,  Sunil Lahari Post :   1987 ते 1988 या काळात दूरदर्शनवर रामायण या मालिकेचं प्रसारण झालं. अरुण गोविल (श्रीराम), दीपिका चिखलिया (सीता), दारा सिंग (हनुमान), सुनील लाहिरी (लक्ष्मण) आणि अरविंद त्रिवेदी (रावण) यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका असलेली ही मालिका अभूतपूर्व गाजली. 78 भागांमध्ये चाललेली ही मालिका दर रविवारी सकाळी प्रसारित व्हायची आणि या काळात सगळे रस्ते ओस पडायचे. या मालिकेतील काही लोकप्रिय भाग जवळपास 8 कोटी ते 10 कोटी लोकांनी पाहिले होते. हा आकडा भारताच्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या एक अष्टमांश इतका होता, यावरून या मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज यावा. कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात ही मालिका पुर्नप्रसारित केली गेली. याकाळातही या मालिकेने रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला. खास बात म्हणजे, तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी या मालिकेने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. आज या घटनेला तीन वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे १६ एप्रिलला ‘रामायण’ या मालिकेतील लक्ष्मण आणि मेघनाद यांच्या युद्धाचा एपिसोड प्रसारित झाला होता. या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका सुनील लहरी यांनी साकारली होती. तर अभिनेते विजय अरोरा यांनी मेघनादची भूमिका साकारली होती. त्यांच्यातील हा युद्धाचा एपिसोड प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. हा एपिसोड इतक्या लोकांनी पाहिला होता की या एपिसोडने नवा विक्रम नोंदवला होता.

सुनील लहरी यांचं ट्वीट

 

लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यातील युद्धाचा एक फोटो पोस्ट करीत सुनील लहरी यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ते लिहितात, आजच्या दिवशी १६ एप्रिल २०२० रोजी ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मण-मेघनाद यांच्या युद्धाच्या एपिसोडने वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. हा टेलिव्हिजन विश्वातील एक मैलाचा दगड ठरला. ७.७ कोटी प्रेक्षकांनी हा एपिसोड पाहिला होता. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. हे सगळे तुम्हा सर्वांमुळेच शक्य झाले आहे.”
त्यांचं हे ट्वीट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

Web Title: Ramayan Serial Made World Record Of Viewership Sunil Lahari Shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.