‘बेबी डॉल’ कनिका कपूरने सनी लिओनीलाही सोडले मागे, ‘कोरोना’ आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:46 PM2020-04-26T12:46:54+5:302020-04-26T12:47:54+5:30
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू झाले आणि लॉकडाऊनच्या या महिनाभराच्या काळात अनेक गोष्टी बदलल्या.
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू झाले आणि लॉकडाऊनच्या या महिनाभराच्या काळात अनेक गोष्टी बदलल्या. महिनाभरापूर्वी असे काही घडेल, याची कल्पनाही कुणी केली नसती. पण महिनाभरात अशा अनेक गोष्टी घडल्या. होय, तूर्तास आम्ही बोलतोय ते अचानक ट्विटर व सोशल मीडियावर ट्रेंड करू लागलेल्या आणि लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींबद्दल. होय, तूर्तास बॉलिवूड सिंगर कनिका कपूर आणि रामानंद सागर यांची मालिका रामायण कधी नव्हे इतकी ट्रेंडमध्ये आहे.
कोरोनाआधी कनिका कपूर हे नाव केवळ ‘चिटियां कलाइयां’ आणि ‘बेबी डॉल’ यासारख्या गाण्यांसाठी ओळखली जायची. म्हणायला कनिका सेलिब्रिटी होती. पण तिची फार अशी चर्चा झाली नाही. पण अचानक कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले आणि तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता वाढली. इतकी की, इंटरनेटवरील लोकप्रियतेच्या बाबतीत कनिकाने प्रियंका चोप्रा, सनी लिओनी, रजनीकांत अशा अनेकांना मागे सोडले. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सेलिब्रिटींमध्ये कनिका कपूरने बाजी मारली.
रामायण या मालिकेबद्दल सांगायचे तर या मालिकेनेही सोशल मीडियावरचे चित्र बदलले. लॉकडाऊनआधी इंटरनेटवर बिग बॉस, तानाजी, गुड न्यूज, ड्राईव्ह असे चित्रपट व टीव्ही शो सर्च करणारे लोक अचानक लॉकडाऊनच्या काळात रामायण सर्च करायला लागले. सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या शोमध्ये रामायणचे नाव आता आघाडीवर आहे.
लॉकडाऊनमुळे सध्या नव्या मालिकांचे शूटींग बंद आहे. नव्या चित्रपटांचे रिलीजही थांबले आहे. अशात टीव्हीवर जुन्या मालिका नव्याने प्रसारित केल्या जात आहेत. दूरदर्शनवर रामायण, महाभारत, बुनियाद अशा जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु झाल्या आहेत.