अंगुरलता सारख्या आमदारामुळे 'अच्छे दिन' आलेच समजा - रामगोपाल वर्मा
By Admin | Published: May 25, 2016 12:24 PM2016-05-25T12:24:12+5:302016-05-25T12:33:06+5:30
आसाम विधानसभेतील भाजपच्या नवनिर्वाचित महिला आमदार अंगुरलता डेकाबद्दल केलेल्या वादग्रस्त टिवटवरुन दिग्दर्शक रामगोपाल वर्माने आता पलटी मारली आहे.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - आसाम विधानसभेतील भाजपच्या नवनिर्वाचित महिला आमदार अंगुरलता डेकाबद्दल केलेल्या वादग्रस्त टि्वटवरुन दिग्दर्शक रामगोपाल वर्माने आता पलटी मारली आहे. मी फक्त अंगूरलताजींचे कौतुक केले. अनेक आमदार दिसायला चांगले नसतात. अंगूरलतामुळे एक बदल झाला आहे. प्रकरण चिघळू नये म्हणून अशी सारवासारवी करणारे टि्वट रामगोपाल वर्माने केले आहे.
दोन दिवसांपूर्वी राम गोपाल वर्माने आमदार जर असे दिसू लागले तर, अच्छे दिन आलेत म्हणून समजा. थँक्यू अंगूरलताजी थँक्यू मोदीजी, मला पहिल्यांदा राजकारण आवडले असे वादग्रस्त टि्वट केले होते. रामगोपाल वर्माची वादग्रस्त टि्वट करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने अशी वादग्रस्त टिवटिव केली आहे.
With regards to my comment on Angoorlataji,I was just paying a compliment to her .since most MLA's don't look good it was such a change— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 25, 2016
सध्या सोशल मिडीया आणि व्हॉटस अॅपवर अंगूरलता डेकाची जोरदार चर्चा सुरु आहे. मॉडलिंग, अभिनय केल्यानंतर अंगुरलताने आता राजकारणात प्रवेश केला आहे. पहिल्याच निवडणुकीत अंगुरलताने काँग्रेसच्या सलग तीन टर्म निवडून येणा-या आमदाराचा पराभव केला. ग्लॅमरस लूक आणि त्यात आमदार त्यामुळे अंगूरलता सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
If MLA can look like this,Achche din aagaye hai..Thank you Angoorlataji,Thank you Modiji..1st time I love politics pic.twitter.com/WPzJgmnb13— Ram Gopal Varma (@RGVzoomin) May 24, 2016