Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’ आत्तापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी सिनेमा, बजेटचा आकडा वाचून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 10:24 AM2022-09-02T10:24:53+5:302022-09-02T10:25:25+5:30
Brahmastra Budget: ‘ब्रह्मास्त्र’ हा रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) व आलिया भटचा ( Alia Bhatt) सिनेमा अखेर रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 9 सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे.
‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) व आलिया भटचा ( Alia Bhatt) सिनेमा अखेर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. येत्या 9 सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. हा चित्रपट बनायला संपूर्ण 4 वर्षे लागलीत आणि गेल्या 8 वर्षांपासून हा सिनेमा चर्चेत होता. चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. आता जरा या चित्रपटाच्या बजेटबद्दल जाणून घेऊ या. ऐकून आश्चर्य वाटेल, पण ‘ब्रह्मास्त्र’ हा बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा आहे.
होय, या चित्रपटावर अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. थोडाथोडका नव्हे तर तब्बल 410 कोटी रूपये. विशेष म्हणजे यात प्रमोशन व चित्रपट थिएटरमध्ये आणण्याचा खर्च सामील नाही. निर्मात्यांच्या मते, हा बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा आहे.
या महागड्या चित्रपटावर झालेला खर्च प्रेक्षकांना एक एका सीनमध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये एकापेक्षा एक धमाकेदार व्हीएफएक्स सीन्स आहेत आणि चित्रपटाचा बजेट वाढण्याचं ते एक प्रमुख कारण आहे.
‘ब्रह्मास्त्र’ची कथा तीन पार्टमध्ये सांगितली जाणार आहे. पहिल्या पार्टमध्ये शिवाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूरने शिवाचं पात्र साकारलं आहे. अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलरला चाहत्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ट्रेलर पाहून चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत. अनेकांनी हा सिनेमा ब्लॉकबस्टर असेल, असं भाकित केलं आहे. अनेक चाहते चित्रपटातील व्हीएफएक्सचं कौतुक करत आहेत. पण सिनेमाची खरी परिक्षा 9 सप्टेंबरलाच होणार आहे.
थोडी खुशी, थोडा गम...
410 कोटींचा सिनेमा येणार म्हटल्यावर निर्माता या नात्याने करण जोहरच्या गोटात आनंद आहे. पण थोडी धाकधूकही आहेच. सध्या चर्चेत असलेला बायकॉट ट्रेंड यामागचं कारण आहे. ‘बायकॉट ब्रह्मास्त्र’ आधीच ट्रेंड होत आहे. बजेट जास्त असल्याने ‘ब्रह्मास्त्र’च्या तिकिटांची किंमत थोडी वाढण्याची शक्यता आहे. अशात बजेट वसूल करण्याची चिंता मेकर्सला असणारच.