BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:01 PM2022-08-21T17:01:10+5:302022-08-21T17:08:18+5:30

Brahmastra Leak: रणबीर, आलिया आणि सोबतीला अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे अनेक कलाकार असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबद्दल एक शॉकिंग बातमी आहे. होय, सिनेमाची स्टोरी लीक झाली आहे.

Ranbir Kapoor-Alia Bhatt starrer Brahmastra story leak Mouni Roy not the lead villain in movie? | BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!!

BIG LEAK! रिलीजआधीच संपला सस्पेन्स, लीक झाली ‘Brahmastra’ची कहाणी!!

googlenewsNext

रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि आलिया भटचा (Alia Bhatt ) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. दीर्घकाळापासून चाहते या सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा करत आहेत आणि अखेर येत्या 9 सप्टेंबरला ही प्रतीक्षा संपणार आहे. रणबीर, आलिया आणि सोबतीला अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे अनेक कलाकार आहेत. पण आता या चित्रपटाबद्दल एक शॉकिंग बातमी आहे. होय, रिलीजआधीच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे.  सोशल मीडियावरब्रह्मास्त्र’ची कथा लीक झाली आहे.

आत्तापर्यंत मौनी रॉय या चित्रपटातील विलेन असेल, असं मानलं जात होतं. पण लीक झालेल्या कथेनुसार, मौनी नाही तर खुद्द आलिया भट हीच विलेन आहे. आलिया रणबीरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि नंतर शिवाच्या मदतीने सर्व अस्त्रांपर्यंत पोहोचते. आलियाने या चित्रपटात ईशाची भूमिका साकारली आहे. ही ईशा स्वत: एक अस्त्र असल्याचं म्हटलं जात आहे.


 
चित्रपटात दीपिका पादुकोण!
 ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दीपिका पादुकोण हिची सुद्धा भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियानुसार, दीपिका एक ‘जल अस्त्र’ असेल. बिग बी या चित्रपटात शिवाच्या गुरूच्या भूमिकेत दिसतील. शिवाला सर्व शक्तींच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतील. आता या ‘लीक’ कथेत किती दम आहे, किती सत्यता आहे हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे.


 
‘ब्रह्मास्त्र’वर ‘बायकॉट’चं संकट

गेल्या काही महिन्यात रिलीज झालेले बॉलिवूडचे अनेक मोठे सिनेमे दणादण आपटले. यादरम्यान अनेक चित्रपटांविरोधात सोशल मीडियावर बायकॉट मोहिम राबवली गेली. आता अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटावरही बायकॉटचं संकट घोंगावू लागलं आहे. रिलीजआधीच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. आता अशात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो? हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor-Alia Bhatt starrer Brahmastra story leak Mouni Roy not the lead villain in movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.