Ranbir Kapoor, Alia Bhatt : महाकालचे दर्शन न घेताच परतले रणबीर-आलिया, मंदिराबाहेर हिंदू संघटनांनी अडवला रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 11:19 AM2022-09-07T11:19:11+5:302022-09-07T13:10:23+5:30
Ranbir Kapoor and Alia Bhatt : रणबीरचं जुनं वक्तव्यं भोवलं, हिंदू संघटनांनी का घेतला आंदोलनाचा पवित्रा?
आलिया भट ( Alia Bhatt )आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोघंही लवकरच आई-बाबा होणार आहेत. पण त्याआधी दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra ) हा सिनेमा रिलीज होतोय. येत्या शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहांत धडकणार आहे. सध्या आलिया व रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजच्या तोंडावर आलिया व रणबीर दोघंही उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. पण दोघांनाही दर्शन न करताच परतावे लागले. हिंदू संघटनांनी आलिया आणि रणबीर यांच्याविरोधात मंदिराबाहेर आंदोलन केलं. ज्यामुळे या दोघांनाही मंदिरात प्रवेश मिळाला नाही.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोघांचाही रस्ता अडवला. या विरोधामुळे रणबीर आणि आलिया मंदिरात पोहोचू शकले नाहीत. प्रचंड विरोध होत असताना चित्रपट दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्मिती टीमने मंदिराच्या बाहेर भेट दिली. मात्र सुरक्षा कारणास्तव रणबीर आणि आलियाला दर्शन न घेता इंदूरला परतावं लागलं.
For security reasons #RanbirKapoor & #AliaBhatt not attended Mahakaleshwar Temple Sandhya Aarti.
— Ashwani kumar (@BorntobeAshwani) September 6, 2022
Due to protest against #Brahmastra only director #AyanMukerji reached the temple and seeks the blessings. pic.twitter.com/hmaVBkcOxu
रणबीर आणि आलिया मंगळवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती हिंदू संघटनांना मिळाली होती. 4 वाजल्यापासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते व्हीआयपी प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. त्यांनी तिथे आलिया रणबीरला प्रवेश देण्यासाठी विरोध केला. पोलिसांनाही त्याची माहिती नव्हती.
प्रॉडक्शन टीम आणि अधिक-यांचे वाहन वेळेवर प्रवेशद्वारावर पोहोचताच हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि आंदोलक यांच्यात वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलकांना हुसकवून लावण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाची निर्मिती टीम आणि अयान मुखर्जी दिग्दर्शकाने बाबा महाकालचे दर्शन घेतले. पण आलिया आणि रणबीरला दर्शन घेता आलं नाही. पोलीस आणि आंदोलक यांच्यातील झालेल्या वादावादीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
#JantaKeeAwaaz say to #Goodbye#Brahmastra
— Suman Rastogi (@SumanRastogi6) September 7, 2022
People are not fooled, they protested strongly beef guy #RanbirKapoor & #AliaBhatt have to run away without entering the temple.
Power of unity #ThatThat#BoycottBrahmastraMovie#Ujjain#BoycottBramhashtrapic.twitter.com/XTx6pijMQH
का होतोय आलिया व रणबीरला विरोध
बीफ खाण्यावरून रणबीरने एक विधान केलं होतं. 2011 मध्ये ‘रॉकस्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तो यावर बोलला होता. माझं कुटुंब पेशावरचं आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबात पेशावरी खाद्यसंस्कृती आहे. मी मटण खातो. मी बीफचाही चाहता आहे, असं रणबीर म्हणाला होता. त्याचा हा जुना व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांनी रणबीरला विरोध चालवला आहे. रणबीर आमच्या गोमातेविरोधात बोलला. त्यामुळे आम्ही त्याला विरोध करत आहोत, असं महाकाल मंदिराबाहेर आंदोलन करणारा एक कार्यकर्ता व्हिडीओत सांगताना दिसत आहे.