Animal First Look Out: अराररारा खतरनाकऽऽऽऽ...! लांब दाढी, कुरळे केस, रक्ताने माखलेली कुऱ्हाड..., रणबीरचा इंटेन्स लुक पाहून फॅन्स क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 10:31 AM2023-01-01T10:31:39+5:302023-01-01T10:32:53+5:30

Animal First Look Out: ‘अ‍ॅनिमल’च्या पोस्टरमध्ये रणबीरचा इंटेन्स लुक पाहून फॅन्स सुपर एक्साइटेड झाले आहेत.

ranbir kapoor and rashmika mandanna animal first look out fans goes crazy | Animal First Look Out: अराररारा खतरनाकऽऽऽऽ...! लांब दाढी, कुरळे केस, रक्ताने माखलेली कुऱ्हाड..., रणबीरचा इंटेन्स लुक पाहून फॅन्स क्रेझी

Animal First Look Out: अराररारा खतरनाकऽऽऽऽ...! लांब दाढी, कुरळे केस, रक्ताने माखलेली कुऱ्हाड..., रणबीरचा इंटेन्स लुक पाहून फॅन्स क्रेझी

googlenewsNext

Animal First Look Out: रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) नव्या वर्षात आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं आहे. रणबीरचा बहुप्रतिक्षीत ‘अ‍ॅनिमल’ (Animal ) हा सिनेमा नव्या वर्षात रिलीज होतोय आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रणबीरने आपल्या या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. ‘अ‍ॅनिमल’च्या पोस्टरमध्ये रणबीरचा इंटेन्स लुक पाहून फॅन्स सुपर एक्साइटेड झाले आहेत.

‘अ‍ॅनिमल’च्या पोस्टरमध्ये रणबीरचा साईड लुक दिसतोय. लांब दाढी, कुरळे केस, रक्ताने माखलेला चेहरा आणि काखेत कुऱ्हाड.  त्याचा पांढरा शर्ट पूर्णपणे रक्ताने माखलेला आहे, हातावर जखम आहे, शिवाय त्याच्या काखेत एक कुऱ्हाड दिसत आहे. ती सुद्धा रक्ताने माखलेली आहे.  रणबीर सिगारेट शिलगवताना पोस्टरमध्ये दिसत आहे. चित्रपटात रणबीरचा खूंखार अंदाज बघायला मिळणार, हेच पोस्टरवरून स्पष्ट होतंय. याआधी कुठल्याही सिनेमात रणबीरचा असा अवतार पाहायला मिळालेला नाही.

रणबीरने हे पोस्टर रिलीज करतात फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रणबीरची बॉडी, त्याचा स्वॅग, त्याचा किलर अंदाज पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. अर्थात काही ट्रोल करणारेही आहेत. मेकर्सनी ‘कबीर सिंग’ आणि ‘पुष्पा’ला मिक्स करून ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरचा लुक क्रिएट केला आहे, असं म्हणत युजर्स ट्रोल करत आहेत. हा केजीएफचा रिमेक आहे का? असं लिहित अनेकांनी रणबीरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्जुन रेड्डी, कबीर सिंग सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी हे ‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शक आहे. रणबीर यात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शुक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत.  येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: ranbir kapoor and rashmika mandanna animal first look out fans goes crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.