रणबीर कपूरने पहिल्या कमाईतून काय खरेदी केलं होतं? किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:18 PM2021-03-20T16:18:10+5:302021-03-20T16:37:27+5:30

रणबीरने संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

Ranbir kapoor bought luxury watch more than 8 lakh rupees with his first salary | रणबीर कपूरने पहिल्या कमाईतून काय खरेदी केलं होतं? किंमत वाचून व्हाल थक्क

रणबीर कपूरने पहिल्या कमाईतून काय खरेदी केलं होतं? किंमत वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

अभिनेता रणबीर कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या 'सांवरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये  डेब्यू करण्यापूर्वी कॅमेर्‍याच्या मागे काम केले होते.  वडील ऋषी कपूर यांच्या १९९९ च्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाचा तो सहाय्यक दिग्दर्शक होता. तुम्हाला माहिती आहे का रणबीरने आपल्या पहिल्या पगारातून काय खेरदी केलं होतं ?

'आ अब लौट चलें' नंतर रणबीरला 2005 मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर 2007 मध्ये रणबीरने अभिनेता म्हणून आपला पहिला चित्रपट 'सांवरिया' साईन केला.

 

सिनेमा फ्लॉप पण रणबीर कपूरला मिळाली सॅलरी
सोनम कपूरनेही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'सांवरीया' जरी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी, यासाठी त्याला चेक मिळाला होता. आपल्या मिळवलेल्या पैशातून लक्झरी घड्याळ खरेदी करण्याची इच्छा त्याने पूर्ण केली. या घड्याळाची किंमत 8.16 लाख रुपये आहे.

रिपोर्टनुसार रणबीरला घड्याळे आवडतात. हेच कारण आहे की त्याने स्वत: ला हबलोट मॅक्सिकन गिफ्ट केले होतंं.  इतकेच नव्हे तर बर्‍याच लोकांना हेही ठाऊक नाही की रणबीर 13 वर्षाचा असताना त्याचे आई-वडील ऋषी आणि नीतू कपूर यांनी रणबीरला ३.२५  लाख रुपयांचे TAG Heuer Grand Prix घड्याळ गिफ्ट केलं होतं. 

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो अयान मुखर्जीचा चित्रपट ब्रह्मास्त्रमुळे चर्चेत आले. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मौनी रॉय व्हिलनच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
 

Web Title: Ranbir kapoor bought luxury watch more than 8 lakh rupees with his first salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.