-अन् रणबीरने कतरिनाला सर्वांसमोर डिवचलं...! व्हायरल होतोय जुना व्हिडीओ, जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:44 PM2022-06-29T17:44:28+5:302022-06-29T17:45:49+5:30

Ranbir Kapoor Katrina Kaif Old Video: सध्या सोशल मीडियावर रणबीर व कतरिनाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि सध्या या व्हिडीओचीही जोरदार चर्चा आहे.

Ranbir Kapoor Got Angry On Katrina Kaif Old Video On Social Media Watch | -अन् रणबीरने कतरिनाला सर्वांसमोर डिवचलं...! व्हायरल होतोय जुना व्हिडीओ, जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

-अन् रणबीरने कतरिनाला सर्वांसमोर डिवचलं...! व्हायरल होतोय जुना व्हिडीओ, जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

Ranbir Kapoor Katrina Kaif Video:  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या चांगलाच चर्चेत आहे. रणबीरचे शमशेरा व ब्रह्मास्त्र असे एक नव्हे दोन सिनेमे एकापाठोपाठ रिलीजसाठी सज्ज आहेत. याशिवाय रणबीर लवकरच बाबा होणार आहे. दोन महिन्यांआधी रणबीरने आलिया भटसोबत लग्नगाठ बांधली आणि आता दोघांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. आलियाआधी रणबीर कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) रिलेशनशिपमध्ये होता. रणबीरसारखीच कतरिना सुद्धा तिच्या वैवाहिक संसारात आनंदी आहे. पण भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नाही असं म्हणतात ना!

सध्या सोशल मीडियावर रणबीर व कतरिनाचा एक जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय आणि सध्या या व्हिडीओचीही जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओत रणबीर कतरिनाला विनाकारण डिवचतांना दिसतोय आणि कतरिना शांत आहे. व्हिडीओ आहे ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंटमधला.रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न एक पत्रकार कतरिना करतो. यावर, सॉरी, पुन्हा विचारा, असं ती म्हणते आणि यानंतर रणबीर असा काही बोलत सुटतो की ऐकणारा प्रत्येक जण थक्क होतो. 

(साभार)

‘ही मला नेहमी म्हणते की मी तुला दोन सुपरहिट दिले आहेत. अजब प्रेम की गजब प्रेमकहानी आणि राजनीती. आम्ही आम्ही करत होतो तेव्हाही ही हेच बोलायची. तू आज जे काही आहेस ते माझ्यामुळे. कारण अजब प्रेम की गजब कहानीमध्ये मी होते. राजनीती चित्रपटाची ओपनिंगही माझ्यामुळे झाली आहे, असं ती म्हणते. मला अनेकदा वाटतं, निर्माता झाल्यावर कतरिनाने माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड करावी. मी तुला प्रॉमिस करतो की, तुझ्यासाठी मी एक सुपरहिट नक्की बनवणार,’असं काय काय रणबीर बोलतो. तो इथेच थांबत नाही तर पुढे अशा अनेक गोष्टी बोलतो.

आता मला उत्तर देऊ दे, असं कतरिना म्हणते. पण रणबीर तिला मध्येच थांबवत, ‘चल अब तारीफ हो गई अभी ज्यादा उंगली मत कर,’असं तो तिला सुनावतो.

Web Title: Ranbir Kapoor Got Angry On Katrina Kaif Old Video On Social Media Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.