रणबीर कपूरने अजय देवगणच्या चित्रपटात काम करण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 08:24 PM2018-12-18T20:24:23+5:302018-12-18T20:26:16+5:30
रणबीर कपूर दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी सिेनेमात काम करणार होता. मात्र आता या चित्रपटात रणबीर काम करणार नसल्याचे समजते आहे.
रणबीर कपूर सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी सिेनेमात काम करणार होता. मात्र आता या चित्रपटात रणबीर काम करणार नसल्याचे समजते आहे. रणबीरने चित्रपट सोडल्यामुळे अजय देवगण व लव रंजनला धक्का बसला आहे. सात महिन्यांपूर्वी चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी रणबीरने लव रंजनची खूप प्रशंसा केली होती व म्हणाला होता की, प्यार का पंचनामाचा दिग्दर्शकासोबत काम करण्याचा आधीपासून विचार करत होतो.
अजय देवगण आणि लव रंजन यांचा रॉम कॉम चित्रपटात रणबीर कपूर काम करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. अजय देवगण वडिलांच्या भूमिकेत व रणबीर कपूर मुलाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता मिळालेल्या वृत्तानुसार रणबीर कपूरने लव रंजनच्या या नवीन सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. यामुळे प्रोडक्शन हाऊसला धक्का बसला आहे. खरे तर या सिनेमाची कल्पना रणबीर कपूरला खूप आवडली होती. त्याने काम करण्याची तयारीही दाखवली होती. मात्र त्याच्याकडे अन्य एका मोठ्या बॅनरची मोठी फिल्म आली असल्यामुळे एकाचवेळी दोन बिग बजेट सिनेमे करणे शक्य नसल्याचे कारण त्याने सांगितले आहे.
आता लव रंजनच्या टीमकडून रणबीरची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लव रंजनच्या या सिनेमाचे शुटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. अजय देवगण आणि रणबीर कपूर यांनी राजनिती चित्रपटात एकत्र काम केले होते. रणबीर ब्रह्मास्त्र व शमशेरा चित्रपटात झळकणार आहे. तर अजय देवगण तानाजी व टोटल धमाल चित्रपटात दिसणार आहे.