OMG!! भांडण झाल्यावर ती..., रणबीर कपूरचा ‘एक्स-गर्लफ्रेन्ड’बद्दल शॉकिंग खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:42 AM2022-01-11T11:42:51+5:302022-01-11T11:43:27+5:30
Ranbir Kapoor talk about his Girlfriend: रणबीर कपूर सध्या आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी त्याच्या आयुष्यात दीपिका पादुकोण होती. कतरिना कैफही होती...
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या आलिया भटच्या प्रेमात आहे. पण त्याआधी त्याच्या आयुष्यात दीपिका पादुकोण ( Deepika Padukone) होती. कतरिना कैफही (Katrina kaif) होती. होय, या दोघींसोबत रणबीर दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होता. पण यापैकी त्याचं एकही रिलेशनशिप यशस्वी ठरलं नाही. एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या एक्स-गर्लफ्रेन्डबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
होय, 2017 साली रणबीरने फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो त्याच्या ‘एक्स’बद्दल बोलला होता. ‘रॉकस्टार’ या चित्रपटासाठी रणबीरला क्रिटीक्स चॉईस आणि पॉप्युलर अवार्ड जिंकला होता. एकापाठोपाठ एक अवार्ड मिळाल्यानंतर कसं वाटतंय? असा साधा प्रश्न रणबीरला या मुलाखतीत विचारला गेला होता. पण या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीरने भलताच खुलासा केला होता.
हसत हसत तो म्हणाला होता, माझी एक गर्लफ्रेन्ड होती. जेव्हा केव्हा आमच्यात भांडण व्हायचं, ती माझे अवार्ड तोडून टाकायची. मी तिच्याजवळ जायचो आणि अगं त्या फिल्मफेअर पुरस्काराला हात लावू नकोस, असं म्हणायचो. आता पुरस्कार तोडणारी ही गर्लफ्रेन्ड कोण? हे मात्र आम्हाला ठाऊक नाही.
आलिया आयुष्यात येण्याआधी रणबीर दीपिका व कतरिनाला डेट करत होता. चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करता करता रणबीर या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता. कतरिना व रणबीरने ‘अजब प्रेम की गजब कहानी’ हा सिनेमा एकत्र केला होता आणि यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. रणबीर व कॅट सहा वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 2015 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं होतं. कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात आलियाची एन्ट्री झाली. रणबीर व आलिया लवकरच लग्न करणार असल्याचं मानलं जातंय.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत या शिवाय रणबीर ‘शमशेरा’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.