OMG हे काय बोलला रणबीर कपूर लग्नाबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:40 PM2018-08-22T14:40:48+5:302018-08-22T14:41:36+5:30

एकीकडे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारिख जाहीर झाली. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा पार पडला. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Ranbir Kapoor said about his marriage | OMG हे काय बोलला रणबीर कपूर लग्नाबद्दल

OMG हे काय बोलला रणबीर कपूर लग्नाबद्दल

googlenewsNext
ठळक मुद्दे'ब्रह्मास्त्र' सिनेमात झळकणार रणबीर - आलिया

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. एकीकडे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारिख जाहीर झाली. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा पार पडला. आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाकडेही चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील वर्षी ही जोडीसुद्धा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. याबाबत रणबीरने खुलासा केला आहे.

रणबीर कपूर म्हणाला की, लग्नाबाबतच्या सर्व चर्चा या ज्यांच्या त्यांच्या व्यवसायाचाच एक भाग आहे. एका चर्चेपासून दुसरी चर्चा आणि मग तिसरी. अशाप्रकारे अफवा पसरतच जातात. लग्न ही अशी गोष्ट आहे जी योग्य त्या वेळी घडून येते. मी ३५ वर्षांचा झालो आहे, आता लग्न केले पाहिजे, असे ठरवून करता येत नाही. तुम्ही आणि तुमचा साथीदार मिळून याबाबत विचार केला तर योग्य वेळी सर्व गोष्टी होतात. पण मी सध्या लग्नाबाबत विचार केलेला नाही.
ब्रह्मास्त्र या आगामी चित्रपटात रणबीर व आलिया एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. आलिया नीतू सिंग यांनाही पसंत असल्याचेही कानावर येतेय. आलियाआधी रणबीर कॅटरिना कैफसोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये होता. पण अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते. कॅटरिनापूर्वी दीपिका पादुकोण रणबीरच्या आयुष्यात होती.

Web Title: Ranbir Kapoor said about his marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.