रणबीर कपूर म्हणतो कतरिनाच्या कर्जाची करायची परतफेड

By Admin | Published: June 10, 2017 10:25 PM2017-06-10T22:25:39+5:302017-06-10T22:27:43+5:30

रणबीर कपूर म्हणतोय मला कतरिना कैफच्या कर्जाची परतफेड करण्यास आवडेल.असं का म्हणाला रणबीर ???

Ranbir Kapoor says repayment of Katrina's loan | रणबीर कपूर म्हणतो कतरिनाच्या कर्जाची करायची परतफेड

रणबीर कपूर म्हणतो कतरिनाच्या कर्जाची करायची परतफेड

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 -  बॉलिवूडचा चॉकेलट बॉय रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा आगामी सिनेमा ""जग्गा जासूस"" 14 जुलै रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  
 
रणबीर आणि कतरिना यांच्या ब्रेकअपबाबत तर आता सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या ब्रेकअपनंतरचा हा ""जग्गा जासूस"" हा पहिला सिनेमा. ऐन शुटिंगदरम्यानच दोघांचं ब्रेक अप झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे सिनेमा पूर्ण होणार की नाही, याची भीती निर्माता, दिग्दर्शक यांच्यासहीत दोघांच्या चाहत्यांमध्येही होती. पण खासगी आयुष्यातील वाद करिअरमध्ये आणू न देता दोघांनी सिनेमा पूर्ण केला. 
 
या सिनेमामध्ये रणबीर आणि कतरिना मुख्य भूमिकेत आहेत.  सध्या दोघंही सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. यावेळी रणबीरसोबत नातेसंबंधांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या कतरिना कैफला एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबत ""जग्गा जासूस"" सिनेमा काम करण्यासंदर्भातील अनुभव विचारले असता, रणबीर म्हणला की, ""मला कतरिनानं दोन हिट सिनेमे दिलेत. ""राजनीती"" आणि ""अजब प्रेम की गजब कहानी"". कतरिना याचा अनेकदा उल्लेख करायची, त्यामुळे या सिनेमाच्या माध्यमातून मला तिच्या कर्जाची परतफेड करण्यास आवडेल."" 
 
रणबीर कतरिनाला हिट सिनेमांचं मशीन मानतो. त्याचं असे म्हणणं आहे की ज्या सिनेमात कतरिना असते, तो सिनेमा नक्कीच हिट होतो. कतरिनासारखी मोठी स्टार फिल्मी इंडस्ट्रीत दुसरी कोणी नाही, असेही रणबीरचं म्हणणं आहे. 
येत्या 10 वर्षात कतरिना दुप्पट यशस्वी होईल, असंही यावेळी रणबीर म्हणाला. 
 
 
(रणबीर करणार का आणखी एक बायोपिक?)
दरम्यान, रणबीर कपूर सध्या पूर्णपणे ‘संजय दत्त’ झालाय. म्हणजेच सध्या रणबीर संजय दत्तची भूमिका जगतोय. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर लीड रोलमध्ये आहे. या भूमिकेसाठी रणबीर किती तयारी करतोय, हे आपल्याला दिसते आहेच. आता संजय दत्तच्या बायोपिकशिवाय आणखी एका बायोपिकमध्ये रणबीर कपूर दिसणार असल्याची खबर आहे.
 
रणबीरला आणखी एका बायोपिकची आॅफर मिळाली आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद उधम सिंह याच्या आयुष्यावर बेतलेला असेल. सुजीत सरकार उधम सिंह यांच्या आयुष्यावर सिनेमा घेऊन येणार आहेत. या चित्रपटात सुजीत यांना रणबीर हवा आहे.
 
सूत्रांच्या मते, सरकार यांनी रणबीरला चित्रपटाची कथा ऐकवलीय आणि रणबीरला ती प्रचंड आवडलीय. अर्थात अद्याप त्याने हा चित्रपट साईन केलेला नाही. संजय दत्तच्या बायोपिकनंतर रणबीर अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगन’मध्ये दिसणार आहे.
 

Web Title: Ranbir Kapoor says repayment of Katrina's loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.