Ranbir Kapoor : "बॉलिवूडचा कमीपणा दाखवण्यात लोकांना मजा वाटतेय", बॉयकॉट ट्रेंडवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 04:15 PM2023-03-02T16:15:27+5:302023-03-02T16:16:26+5:30

Ranbir Kapoor : अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना बायकॉट बॉलिवूड मोहिमेचा फटका बसला. अनेक चित्रपटांविरोधात सोशल मीडियावर बायकॉट मोहिम राबवली गेली. रणबीर यावर बोलला...

ranbir kapoor shares views on boycott bollywood tu jhoothi main makkaar | Ranbir Kapoor : "बॉलिवूडचा कमीपणा दाखवण्यात लोकांना मजा वाटतेय", बॉयकॉट ट्रेंडवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला!

Ranbir Kapoor : "बॉलिवूडचा कमीपणा दाखवण्यात लोकांना मजा वाटतेय", बॉयकॉट ट्रेंडवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला!

googlenewsNext

 रणबीर कपूरचा  (Ranbir Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा लवकरच येतोय. चित्रपटात रणबीरसोबत श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहे. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी हिट झाली आहेत. सध्या रणबीर व श्रद्धा या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. लखनौमधील अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीरला अनेक प्रश्न विचारण्यात आले. बायकॉट बॉलिवूडवरही तो बोलला.

अलीकडच्या काळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना बायकॉट बॉलिवूड मोहिमेचा फटका बसला. अनेक चित्रपटांविरोधात सोशल मीडियावर बायकॉट मोहिम राबवली गेली. याबद्दल रणबीरला विचारलं असता, बायकॉट बॉलिवूड ही सोशल मीडियावरची मोहिम निरर्थक असल्याचं तो म्हणाला.

काय म्हणाला रणबीर?
बॉलिवूडच्या चित्रपटांविरोधातील मोहिमा मला 'बेसलेस' वाटतात. महामारीनंतर अनेक निगेटीव्ह गोष्ट आल्या. बॉयकॉट बॉलिवूड सारख्या अशा अनेक गोष्टी मला निरर्थक वाटतात. चित्रपट फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बनवले जातात. आम्ही काही जगाला वाचवायला निघालेलो नाही.  आम्ही फक्त प्रेक्षकांसाठी सिनेमे बनवतो. प्रेक्षक मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहायला येतात, काही काळ आपल्या सर्व चिंता विसरतात. बायकॉटचा मुद्दा म्हणूनच मला समजण्यापलीकडे आहे. माझ्यामते, प्रत्येकजण स्वत:ला बेस्ट व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे मजेशीर आहे. बॉलिवूडला कमी लेखण्यात लोकांना कुठला आनंद मिळतो, मला ठाऊक नाही, असं रणबीर म्हणाला.

रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजनने केले आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. 

Web Title: ranbir kapoor shares views on boycott bollywood tu jhoothi main makkaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.