Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धा का एकत्र करत नाहीयेत ‘तू झूठी मैं मक्कार’चं प्रमोशन? गडबड काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:16 PM2023-02-22T14:16:53+5:302023-02-22T14:17:21+5:30

Tu Jhoothi Main Makkaar, Ranbir Kapoor, Shraddha Kapoor : रणबीर व श्रद्धा दोघंही 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अर्थात दोघंही वेगवेगळं प्रमोशन करत आहेत.

Ranbir Kapoor Shraddha Kapoor separately promote Tu Jhoothi Main Makkaar but why | Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धा का एकत्र करत नाहीयेत ‘तू झूठी मैं मक्कार’चं प्रमोशन? गडबड काय?

Tu Jhoothi Main Makkaar : रणबीर-श्रद्धा का एकत्र करत नाहीयेत ‘तू झूठी मैं मक्कार’चं प्रमोशन? गडबड काय?

googlenewsNext

या वर्षाची सुरुवात शाहरुख, दीपिका आणि जॉनच्या 'पठाण' चित्रपटाने झाली. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. यानंतर रिलीज झाला तो कार्तिक आर्यनचा 'शहजादा'. कार्तिकच्या या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे तर रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व श्रद्धा कपूरच्या ( Shraddha Kapoor) 'तू झुठी मै मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या सिनेमाची. रणबीर व श्रद्धाचा हा सिनेमा येत्या ८ मार्चला रिलीज होतोय. सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पाेहोचली आहे. यावेळी दिग्दर्शक लव रंजन धमाका करणार, असं चाहत्यांना वाटतंय. तूर्तास रणबीर व श्रद्धा दोघंही या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. अर्थात दोघंही वेगवेगळं प्रमोशन करत आहेत.

प्रमोशनमध्ये रणबीर व श्रद्धा एकदाही एकत्र दिसलेले नाहीत. साहजिकच दोघंही वेगवेगळं प्रमोशन का करत आहेत, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर आता त्याचं कारणही समोर आलं आहे. होय, 'तू झुठी मै मक्कार'च्या प्रमोशनदरम्यान श्रद्धा व रणबीर एकदाही एकत्र दिसले नाहीत. याचं कारण आहे, दिग्दर्शक लव रंजन. होय, संपूर्ण प्रमोशनदरम्यान श्रद्धा व रणबीर एकत्र दिसणार नाहीत, दोघंही वेगवेगळं प्रमोशन करतील, ही लव रंजन यांची आयडिया आहे. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणं हे त्यामागचं कारण आहे. त्यामुळे प्रेक्षक श्रद्धा व रणबीरला आता थिएटरमध्येच एकत्र बघू शकणार आहेत.

'तू झुठी मै मक्कार'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्येही श्रद्धा व रणबीर एकत्र दिसले नव्हते. म्हणजे, श्रद्धा यायची तेव्हा रणबीर स्टेजवरून खाली उतरायचा आणि रणबीर यायचा तेव्हा श्रद्धा स्टेजवरून खाली असायची. संपूर्ण प्रमोशनमध्येही हीच स्ट्रॅटेजी वापरण्यात आली आहे. रणबीर व श्रद्धाच्या जोडीचा फ्रेशनेस कायम राहावा, हा यामागचा उद्देश आहे. आता सिनेमाचा याचा किती फायदा होतो ते बघूच.

 रणबीर व श्रद्धासाठी हा चित्रपट अनेक अर्थांनी खास आहे. हे दोघे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हे दोन्ही कलाकार एकमेकांना लहानपणापासून ओळखत असले तरी. दोघांमध्ये चांगलं बाँडिंग आहे, जे ट्रेलरमध्येही दिसली होती.

Web Title: Ranbir Kapoor Shraddha Kapoor separately promote Tu Jhoothi Main Makkaar but why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.