Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची कमाल! पहिल्या दिवशी 'तू झुठी मैं मक्कार'ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:03 PM2023-03-09T13:03:58+5:302023-03-09T13:06:00+5:30

Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' काल प्रदर्शित झाला. आता या सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Ranbir Kapoor Shraddha Kapoor Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1 | Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची कमाल! पहिल्या दिवशी 'तू झुठी मैं मक्कार'ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1: रणबीर-श्रद्धाच्या जोडीची कमाल! पहिल्या दिवशी 'तू झुठी मैं मक्कार'ने जमवला इतक्या कोटींचा गल्ला

googlenewsNext

Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' काल प्रदर्शित झाला. आता या सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. 'तू झुठी मैं मक्कार' हा सिनेमा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'पठाण' सारखाच धुमाकूळ घालेल, असा अंदाज होता. पण तूर्तास तरी असं चित्र नाही. मात्र तरिही 'तू झुठी मैं मक्कार'ने चांगली सुरूवात केली आहे.

श्रद्धा व रणबीर कपूर ही जोडी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतेय. या फ्रेश जोडीला पाहायला चाहते उत्सुक होते. त्याचा फायदा सिनेमाला झाला आहे. शिवाय होळीच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज झाल्याने त्याचाही लाभ चित्रपटाला मिळाला. सुमारे ९५ कोटी बजेट असलेल्या रणबीर व श्रद्धाच्या 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींची कमाई केली आहे. याचसोबत 'तू झुठी मैं मक्कार' हा सिनेमा रणबीरच्या टॉप ओपनर चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानी आला आहे. रणबीरच्या ब्रह्मास्त्र या सिनेमाने पहिल्याच दिवशी ३६ कोटींचा बिझनेस केला होता.

'तू झुठी मैं मक्कार' हा सिनेमा 'पठाण'नंतरचा दुसरा मोठा हिट असू शकतो. पण असं काहीही दिसलं नाही. 'पठाण'ने पहिल्याच दिवशी ५७ कोटींचा गल्ला जमवला होता. याऊलट 'तू झुठी मैं मक्कार'ने पहिल्या दिवशी फक्त १५.७३ कोटी कमावले आहेत. म्हणजेच 'तू झुठी मैं मक्कार' पठाणच्या आसपासही नाही.
'तू झुठी मैं मक्कार' लव रंजन यांनी दिग्दर्शित केला आहे. लव रंजना रोमँटिक ड्रामा चित्रपटांसाठी ओळखले जातात. प्रेक्षकांना चित्रपट भावला आहे. पण येत्या दिवसांत या चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कमाईच्या आकड्यांवर सर्वांचीच नजर असणार आहे. 

Web Title: Ranbir Kapoor Shraddha Kapoor Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.