आलिया प्रेग्नंट, पापाराझींनी शुभेच्छा दिल्यावर रणबीर कपूर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 02:04 PM2022-07-07T14:04:31+5:302022-07-07T14:05:21+5:30

पापाराझींनी 'डॅड-टू-बी' अभिनेत्याचे लवकरच वडील होण्याबद्दल अभिनंदन केले. यावर रणवीरने जी प्रतिक्रिया दिली त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

Ranbir kapoor tells paparazzi on congratulate him says tu chacha ban gaya tu mama ban gaya | आलिया प्रेग्नंट, पापाराझींनी शुभेच्छा दिल्यावर रणबीर कपूर म्हणाला...

आलिया प्रेग्नंट, पापाराझींनी शुभेच्छा दिल्यावर रणबीर कपूर म्हणाला...

googlenewsNext

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 22 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'शमशेरा' (Shamshera)चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पापाराझींनी 'डॅड-टू-बी' अभिनेत्याचे लवकरच वडील होण्याबद्दल अभिनंदन केले, तेव्हा त्याची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती.
 रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये रणबीरने रणवीर सिंग (Ranveer Singh)ला त्याच्या 37 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया भट्टने 27 जून रोजी सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची अनाउंसमेंट केली होती.  इन्स्टाग्राम पोस्टनंतर, करण जोहर, प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रणबीर आणि आलियाचे अभिनंदन केले.

व्हायरल होतोय रणबीरचा व्हिडीओ
 'डॅड-टू-बी' रणबीर कपूरचा पापाराझींसोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेक चाहत्यांनी अभिनेत्याच्या रिअॅक्शनवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये फोटोग्राफर रणबीर कपूरच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर जमले असताना, त्यांनी अभिनेत्याला लवकरच वडील होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावर रणबीर म्हणाला, 'तू काका झालास, तू मामा झालास.' याशिवाय त्याने रणवीर सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. 6 जुलै बुधवारी रणवीर सिंहचा 37 वा वाढदिवस होता.

रणबीर कपूरचे दोन मोठे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. तो लवकरच 'शमशेरा'मध्ये एका डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज होणार आहे, ज्यामध्ये रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट यावर्षी ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो प्रथमच पत्नी आलिया भटसोबत दिसणार आहे. अयान मुखर्जीच्या या चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
 

Web Title: Ranbir kapoor tells paparazzi on congratulate him says tu chacha ban gaya tu mama ban gaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.