'अ‍ॅनिमल'साठी रणबीरने घेतलं बॉबी देओलपेक्षा १४पट जास्त मानधन, जाणून घ्या इतर स्टारकास्टचं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 01:23 PM2023-09-29T13:23:23+5:302023-09-29T13:27:08+5:30

Animal Movie : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने संदीप रेड्डी वांगाच्या अ‍ॅनिमलचा टीझर नुकताच रिलीज झाला. या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Ranbir Kapoor took 14 times more than Bobby Deol for 'Animal', know the remuneration of other star cast | 'अ‍ॅनिमल'साठी रणबीरने घेतलं बॉबी देओलपेक्षा १४पट जास्त मानधन, जाणून घ्या इतर स्टारकास्टचं मानधन

'अ‍ॅनिमल'साठी रणबीरने घेतलं बॉबी देओलपेक्षा १४पट जास्त मानधन, जाणून घ्या इतर स्टारकास्टचं मानधन

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ने संदीप रेड्डी वांगाच्या अ‍ॅनिमल(Animal)चा टीझर नुकताच रिलीज झाला. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. यात रणबीर व्यतिरिक्त बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूरने तगडे मानधन घेतले आहे. 

आधी वृत्त आले होते की, अभिनेता रणबीर कपूरने या चित्रपटासाठी ७० कोटी मानधन घेतले आहे. ही रक्कम त्याचा शेवटचा चित्रपट तू झूठी मैं मक्कारपेक्षा खूप जास्त आहे. या चित्रपटात त्याने लव्हर बॉयची भूमिका बजावली होती. या भूमिेकेसाठी त्याने २०-२५ कोटी मानधन घेतले होते. अ‍ॅनिमलमध्ये रणबीर कपूरचा दमदार लूक भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना महागात पडले. रणबीर कपूरचे मानधन ७० कोटी आहे. त्याच्या तुलनेत इतर स्टारकास्टने कमी मानधन घेतले आहे. सर्वात कमी मानधन अनिल कपूरने घेतले आहे. अनिल कपूरची छोटीशी भूमिका आहे. इंस्टेंट बॉलिवूडच्या रिपोर्टनुसार, अनिल कपूरने जवळपास २ कोटी मानधन घेतले आहे.

रश्मिका मंदानाने अ‍ॅनिमलसाठी घेतले इतके मानधन
रश्मिकाला खूप कमी मानधन दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीला ४ कोटी रुपये मानधन दिले आहे. अ‍ॅनिमलसाठी रणबीर कपूरला बॉबी देओल पेक्षा १४ पट जास्त मानधन दिले आहे. बॉबी देओलला जवळपास ४-५ कोटी मानधन दिले आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ranbir Kapoor took 14 times more than Bobby Deol for 'Animal', know the remuneration of other star cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.