शाहरुख खानच्या पत्नीला रणबीरचे पत्र
By Admin | Published: March 26, 2017 04:57 PM2017-03-26T16:57:33+5:302017-03-26T17:31:24+5:30
बॉलिवूड किंग शाहरुख खानची पत्नी गौरीला रणबीर कपूरने पत्र लिहले आहे. रणबीरने लिहलेले हे पत्र गौरी खानने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - बॉलिवूड किंग शाहरुख खानची पत्नी गौरीला रणबीर कपूरने पत्र लिहले आहे. रणबीरने लिहलेले हे पत्र गौरी खानने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. बांद्रातील पाली हिल परिसरात रणबीर कपूरने नवे घर घेतले होते, त्या घराचे इंटेरिअर डिझायन गौरी खानने केले आहे. त्यामुळे रणबीरने गौरीला पत्र लिहून धन्यवाद म्हटलं आहे.
या पत्रामध्ये रणबीरने गौरीचे मनापासून धन्यवाद केलं आहे, तो लिहतो, गौरीने माझ्या मनाप्रमाणे घराची सजावट केली आहे. तीच्या सोबत काम करताना एक वेगळी प्रेरणा मिळती. माझं नवे घर कसं सजवायचं घरामध्ये काय हवं याची मला कल्पना नव्हती पण गौरीने चांगल्या पद्धतीने घराची सजावट केली आहे. घरातील प्रत्येक वस्तू माझ्या आवडची आहे. सर्व काही माझ्या टेस्टप्रमाणे आहे. एका क्षणात मला त्या घराच आपलंपण वाटलं.
नव्या घराची सजावट करण्याची सगळी जबाबदारी रणबीरने त्याची आई नितू सिंगवर सोडलेली होती. शाहरूखच्या ह्यमन्नतह्ण बंगल्यातील इंटेरियर नितूला खूप आवडत असल्याने, इंटेरियरच्या बाबतीत तीने शाहरूखची पत्नी गौरी खानकडून मदत घेतली. आणि घराची सर्व जबाबदारी गौरीवर सोपवली होती. रणबीरच्या पत्रावरुन तिने ती चोख बजावल्याचे दिसून येते.