भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:30 AM2021-04-30T10:30:17+5:302021-04-30T10:33:08+5:30

रणधीर कपूर सध्या कोरोनाला झुंज देत आहेत. अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.

randhir kapoor to sell ancestral rk house in chembur after his brothers rishi kapoor and rajeev kapoor death | भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

googlenewsNext
ठळक मुद्देऋषी आणि राजीव यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर  अद्याप या धक्क्यातून बाहेर आलेले नाही.

रणधीर कपूर (Randhir Kapoor ) सध्या कोरोनाला झुंज देत आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रणधीर यांच्यासोबत त्यांचे पाच स्टाफ मेंबर्सही पॉझिटीव्ह आढळले आहेत. अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लहान भाऊ ऋषी कपूर (Rishi Kapoor) व राजीव कपूर (Rajeev Kapoor) यांच्या निधनानंतर रणधीर कपूर यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय. होय, चेंबूर येथील वडिलोपार्जित घर विकण्याच्या निर्णयापर्यंत ते आले आहेत. याच घरात रणधीर यांचे बालपण गेले. याच घरात ते लहानाचे मोठे झालेत.
रणधीर यांचा हा निर्णय अंतिम असल्याचेही कळतेय. राजीव यांच्या निधनानंतर रणधीर एकटे पडले आहेत. त्यांना एकाकी वाटू लागले आहे. अशात आता त्यांना कुटुंबासोबत राहायचे आहे. (Randhir Kapoor to sell ancestral RK house in chembur)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रणधीर यांनी सांगितले की, राजीवचे पुण्यात घर होते. पण तो माझ्यासोबतच मुंबईत अधिक राहायचा. तो गेल्यानंतर मी एकटा पडलो आहे.त्यामुळे मी कुटुंबासोबत राहण्याचा विचार केला.
वडिलोपार्जित घराबद्दल ते म्हणाले, या घरात मी वाट्टेल तोपर्यंत राहू शकतो, असे माझे आईवडिल मला सांगून गेले होते. पण मी हे विकेल तेव्हा, त्यातून मिळणारी रक्कम मला ऋषी, राजीव, ऋतू व रिमा यांच्यात वाटून द्यावी लागेल.
चर्चा खरी मानाल तर रणधीर यांनी वांद्र्यात एक घर आधीच खरेदी केले आहे. हे घर राहण्यासाठी तयार आहे. या घरात रणधीर लवकरच शिफ्ट होऊ शकतात.

ऋषी आणि राजीव यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर  अद्याप या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. कपूर घराण्याच्या या पिढीचे रणधीर कपूर आणि त्याचा बहिण रीमा जैन हे दोघेच हयात आहेत. अलीकडे दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे.

राजीव कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. पत्नीशी मतभेद झाल्यामुळे ते दोघे वेगळे झाले होते. दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी कधीच एकत्र पाहिले गेले नव्हते. रणधीर कपूर आणि रीमा जैन यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, आता ते दोघेच राजीव कपूर यांच्या मालमत्तेचे वारस आहेत. या सुनावणीत हायकोर्टाने या दोघांनाही राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचा पुरावा आणण्यास सांगितले आहे.

Web Title: randhir kapoor to sell ancestral rk house in chembur after his brothers rishi kapoor and rajeev kapoor death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.