'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने अभिनयासोबत या क्षेत्रात टाकलं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 01:54 PM2024-09-21T13:54:44+5:302024-09-21T13:55:22+5:30

Reshma Shinde : रेश्मा शिंदेने अभिनयासोबत वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. ती उद्योजिका बनली आहे.

Rang Maza Vegala Fame Actress Reshma Shinde has stepped into this field with acting | 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने अभिनयासोबत या क्षेत्रात टाकलं पाऊल

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने अभिनयासोबत या क्षेत्रात टाकलं पाऊल

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत काम करताना दिसते आहे. दरम्यान आता रेश्माने अभिनयासोबत वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. ती उद्योजिका बनली आहे. ती कोणत्या क्षेत्रात काम करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना. तर तिने एका ज्वेलरी ब्रॅण्डशी जोडली गेली आहे. तिने पुण्यात या ज्वेलरीचे दुकान सुरू केले आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदेने एका ज्वेलरी ब्रॅण्डसोबत पार्टनरशीप घेतली आहे. तिने पुण्यातील कोथरूडमध्ये ज्वेलरी शॉप सुरू केले आहे. आज या दुकानाचे उद्घाटन पार पडणार आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले की, अखेर मी स्वतःचे ज्वेलरी स्टोअर सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी पालमोनाससोबत पार्टनरशीप केली आहे. भारतातील पहिले डेमिफाइन ज्वेलरी ब्रॅण्ड आहे. आज या स्टोअरच्या उद्घाटनाला सहभागी झालात तर मला आवडेल. तुमची उपस्थिती माझ्यासाठी महत्त्वाची आहे.

वर्कफ्रंट
अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेशिवाय रंग माझा वेगळा,नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Web Title: Rang Maza Vegala Fame Actress Reshma Shinde has stepped into this field with acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.