सावळ्या रंगामुळे करणने केलं होतं राणीला रिजेक्ट; 'या' व्यक्तीमुळे मिळाला 'कुछ कुछ होता हैं'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 01:05 PM2024-03-21T13:05:32+5:302024-03-21T13:06:00+5:30
Rani mukerji: राणीला सुरुवातीच्या काळात अनेकांनी तिच्या रंगावरुन आणि कमी उंचीवरुन रिजेक्ट केलं होतं. या करण जोहरने सुद्धा तिला सुरुवातीला नकारच दिला होता.
कलाविश्वात आज अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना सुरुवातीच्या काळात अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. आज इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव घेतलं जातं. मात्र, एक काळ असा होता जेव्हा तिला अनेकांनी रिजेक्ट केलं होतं. परंतु, मेहनतीच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आज राणी तिच्या ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे त्यामुळे तिच्याविषयीचे अनेक किस्से सध्या चर्चिले जात आहेत.
कुटुंबाकडून मिळाला अभिनयाचा वारसा
राणी मुखर्जीचे वडील स्वत: कलाविश्वाशी निगडीत होते. फिल्माया स्टुडिओचे ते संस्थापक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. तर, तिची आई कृष्णा मुखर्जी या प्रसिद्ध बंगाली प्लेबॅक सिंगर होत्या. राणीचा मोठा भाऊ राज मुखर्जी निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तर तिची मावशी देबाश्री रॉय प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री होती. त्यामुळे राणीला कुटुंबाकडूनच कलेचा वारसा मिळाला होता. मात्र, तरी सुद्धा तिला बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण करायला स्ट्रगल करावा लागला.
रिजेक्शनचा केला सामना
रिपोर्टनुसार, राणीचं फ्लिमी बॅकग्राऊंड होतं तरीदेखील तिला इंडस्ट्रीत स्ट्रगल करावा लागला. काम मिळावं यासाठी तिने अनेकांच्या ऑफिसचे उंबरठे झिजवले. अनेक सिनेमांसाठी तिने ऑडिशन दिले. मात्र, तिला बऱ्याचदा नकार सहन करावा लागला. परंतु, अशोक गायकवाड यांनी राजा की आयेगी बारात या सिनेमासाठी राणीची निवड केली. हा सिनेमा फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र, आदित्य चोप्रा यांना राणीचं काम आवडलं. याच काळात करण जोहर त्याच्या कुछ कुछ होता हैंमधील टीनासाठी अभिनेत्रीचा शोध घेत होता. त्यामुळे आदित्य यांनी राणीचं नाव करणला सुचवलं. परंतु, करणने राणीचा फोटो पाहूनच तिला रिजेक्ट केलं होतं.
राणीच्या वर्णामुळे करणने केलं होतं रिजेक्ट
सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्यने करणला राणीचं नाव सुचवल्यानंतर त्याने तिला रिजेक्ट केलं होतं. सावळा रंग आणि उंची कमी असल्यामुळे त्याने फोटो पाहूनच तिला नकार दिला. त्यानंतर त्याने अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले. मात्र, अखेर राणीचीच त्याने टीनासाठी निवड केली. एका टॉक शोमध्ये करणने देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता.
राणी मुखर्जीचे सुपरहिट ठरलेले सिनेमा
'कुछ कुछ होता है', 'गुलाम', 'कभी अलविदा ना कहना', 'चलते-चलते', 'ब्लॅक', 'मुझसे दोस्ती करोगी', 'मर्दानी', 'बंटी और बबली', 'हम तुम', 'वीर जारा', 'चोरी चोरी चुपके चुपके', 'हद कर दी आपने', 'लागा चुनरी में दाग', 'नो वन किल्ड जेसिका', 'युवा', 'हिचकी' आणि 'मिसेज चेटर्जी वर्सेज नॉर्वे' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमा तिने दिले आहेत.