राणी मुखर्जी आता दिशा पाटणी, पांड्या बद्रर्सची शेजारी; मुंबईत घेतलं एवढं महागडं घर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:18 PM2021-08-12T12:18:40+5:302021-08-12T12:22:10+5:30
राणीने मुंबईतील खार परिसरात फ्लॅट खरेदी केला आहे. राणीने खरेदी केलेला 4 बीएचके फ्लॅट 22 व्या मजल्यावर आहे.
होय, बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ( Rani Mukerji) आता अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री दिशा पाटणी, क्रिकेटर हार्दिक पांड्या व कुणाल पांड्याची शेजारी बनली आहे. राणीने मुंबईतील खार भागात एक अलिशान घर खरेदी केले आहे.राणीच्या या घरातून समुदाचा सुंदर नजारा दिसतो.
‘मनी कंट्रोल’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे. राणीने खरेदी केलेला 4 बीएचके फ्लॅट 22 व्या मजल्यावर आहे. 1485 स्क्वेअर फिटच्या या फ्लॅटची 7 कोटी 12 लाख रुपये असल्याचे कळते. अर्थात राणीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
22 व्या मजल्यावर फ्लॅट असलेल्या ठिकाणी दोन कार पार्किंगची जागा आहे. याशिवाय एक मोठे जिम, निरभ्र आकाशातील ता-यांना बघण्यासाठीची खास जागा याठिकाणी आहे. रॉक क्लाइंबिंगसाठीही कृत्रिम व्यवस्था करण्यात आली आहे. राणीच्या या अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे. या अपार्टमेंटमध्ये एक आउटडोअर फिटनेस सेंटर देखील आहे.
दिशा पाटणीने अलीकडे याच बिल्डिंगमध्ये 16 व्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला होता. त्याची किंमत 5.9 कोटी असल्याचे कळते. टायगर श्रॉफ शिवाय हार्दिक व कुणाल या पांड्या ब्रदर्सनीही येथे घर खरेदी केल्याचे समजते.
राणी मुखर्जीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ या सिनेमात बिझी आहे. हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. आशिम छिब्बर दिग्दर्शित या सिनेमात एका आईचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे.
याआधिी 2019 मध्ये राणीचा ‘मर्दानी 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. याशिवाय ‘बंटी और बबली 2’ या सिनेमातही राणी दिसणार आहे. हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार असून कोरोना महामारीमुळे याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.