‘मीटू’वर बोलून अशी फसली राणी मुखर्जी, नेटक-यांनी केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 03:38 PM2018-12-31T15:38:35+5:302018-12-31T15:42:57+5:30

अभिनेत्री राणी मुखर्जीने ‘मी टू’ मोहिमेसंदर्भात असा काही मुद्दा मांडला की, ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. 

rani mukerji trolled for her opinion on metoo | ‘मीटू’वर बोलून अशी फसली राणी मुखर्जी, नेटक-यांनी केले ट्रोल

‘मीटू’वर बोलून अशी फसली राणी मुखर्जी, नेटक-यांनी केले ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मीटू’ मुद्यावरील चर्चेदरम्यान राणीने असा काही मुद्दा मांडला की, ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. 

मावळत्या वर्षांत ‘मीटू’ मोहिमेने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. तनुश्री दत्ताने या मोहिमेला वाचा फोडली आणि बघता बघता मनोरंजन विश्वातील अनेक महिलांनी ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाच्या प्रकरणांविरोधात आवाज उठवला. साजिद खान, रजत कपूर, आलोक नाथ, सुभाष घई, अन्नू मलिक अशा अनेक बड्या लोकांची नावे या प्रकरणांत समोर आले. आता पुन्हा एकदा ‘मीटू’ मोहिम सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अर्थात कुठल्या आरोपामुळे नाही तर राणी मुखर्जीच्या एका विधानामुळे. होय, न्यूज 18 वर ‘मीटू’ मुद्यावरील चर्चेसाठी राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट अशा अनेक अभिनेत्रींना निमंत्रित केले गेले. या चर्चेदरम्यान राणीने असा काही मुद्दा मांडला की, ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. 




आता राणीने असे म्हटले तरी काय? तर ‘मीटू’वर चर्चा करताना राणीने मुलींनी मार्शल आर्ट्स शिकण्याची गरज व्यक्त केली. मुलींनी,महिलांनी स्वत:च्या संरक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकावे. शाळेच्या अभ्यासक्रमातही याचा समावेश व्हावा. स्वसंरक्षणासाठी महिलांनी समर्थ असावे, असे राणी म्हणाली. पण राणीचे हे मत दीपिका पादुकोणला जराही पटले नाही. तिने राणीला मध्येच थांबवत, मुळात मार्शल आर्ट्सची गरजचं का पडावी? असा सवाल उपस्थित केला. महिलांसाठी वातावरण इतकं सुरक्षित असायला हवे की, त्यांना स्वसंरक्षणासाठी अशा गोष्टी शिकण्याची गरजचं भासू नसे. मार्शल आर्ट्स शिकावे पण त्यापूर्वी लोकांची मानसिकता बदलली गेली पाहिजे, असे रोखटोक मत दीपिकाने मांडले. दीपिकाची ही बाजू आलिया व अनुष्कानेही उचलून धरली. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग काय, नेटक-यांनी राणीवर निशाणा साधला.



राणीकडे ना मुद्दा आहे, ना विचार, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने जास्त बोलण्याने आपण जास्त प्रभावी ठरू, असे कदाचित राणीला वाटत असावे, असे लिहिले. एकंदर काय तर मीटूवर बोलणे राणीला चांगलेच महागात पडले.
वाचा, राणीच्या विधानावर युजर्सच्या कमेंट्स...





 


 

Web Title: rani mukerji trolled for her opinion on metoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.