Rani Mukherjee Pregnant: राणी मुखर्जी दुसऱ्यांदा होणार आई?, व्हिडीओ समोर येताच रंगली तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:45 AM2022-07-23T11:45:46+5:302022-07-23T11:46:09+5:30

Rani Mukherjee: राणी मुखर्जीचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.

Rani Mukherjee Pregnant: Rani Mukherjee will be a mother for the second time? | Rani Mukherjee Pregnant: राणी मुखर्जी दुसऱ्यांदा होणार आई?, व्हिडीओ समोर येताच रंगली तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा

Rani Mukherjee Pregnant: राणी मुखर्जी दुसऱ्यांदा होणार आई?, व्हिडीओ समोर येताच रंगली तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherjee) बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. ती शेवटची करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली होती. आता राणी मुखर्जीचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर येताच पुन्हा एकदा राणी मुखर्जीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राणी मुखर्जी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. पापाराझीच्या कॅमेर्‍यात तिला फार कमी वेळा स्पॉट केले जाते. नुकतीच अभिनेत्री राणी मुखर्जी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर दिसली. यादरम्यान तिने हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि गुलाबी दुपट्टा घेतला होता. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आता राणीची फिगर पाहून सगळेच तिच्या बेबी बंप आणि प्रेग्नेंसीची चर्चा करत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये फक्त आणि फक्त राणीच्या प्रेग्नेंट असल्याची चर्चा होताना दिसते आहे.


राणी गणेश भक्त आहे. त्यामुळे ती आज गणपतीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचली. मंदिरातून बाहेर पडताना ती दिसली. अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या शरारा स्टाईल सूटसोबत गुलाबी रंगाचा दुपट्टा परिधान केला होता. तिच्या चेहऱ्यावर मास्क होता. पण पापाराझीच्या सांगण्यावरून अभिनेत्रीने मास्क काढून पोज दिली आणि निघून गेली.


राणी मुखर्जी इंडस्ट्रीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने आपल्या कारकिर्दीत 'ब्लॅक', बंटी और बबली, वीर जारा, कुछ कुछ होता है, मर्दानी, हिचकी सारखे उत्तम चित्रपट दिले आहेत. लग्नानंतर आणि मुलीच्या जन्मानंतर साहजिकच तिचे चित्रपटांमधील दिसणे कमी झाले आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'बंटी और बबली २' मध्ये ती शेवटची दिसली होती. या चित्रपटात सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी मुख्य भूमिकेत होते. ती 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: Rani Mukherjee Pregnant: Rani Mukherjee will be a mother for the second time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.