रानू मंडल पुन्हा चर्चेत; 'बचपन का प्यार' गाताना व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 16:52 IST2021-08-15T16:47:37+5:302021-08-15T16:52:01+5:30
Bachpan Ka Pyaar : Social Media वर रानू मंडलचा एक गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ती सध्या चर्चेत असलेल्या 'बचपन का प्यार' हे गाणं गाताना दिसत आहे.

रानू मंडल पुन्हा चर्चेत; 'बचपन का प्यार' गाताना व्हिडीओ झाला व्हायरल
कधी कुणाचं नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. असंच काहीसं रानू मंडलच्या बाबतीत घडलं. काही सेकंदात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू मंडलचे आयुष्यच बदलून गेले आणि रातोरात ती लोकप्रिय झाली. रानू मंडलला तिच्या सुरेल स्वरांमुळे असंख्य चाहते मिळाले. एक प्यार का नगमा है गाणे गाऊन लोकप्रिय झालेली रानू मंडल अचानक पुन्हा गायब झाली होती. त्यानंतर ती कुठे आहे?, काय करते असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता पुन्हा एकदा तिचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सध्या छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात राहणाऱ्या सहदेव याच्या 'बचपन का प्यार' या गाण्याच्या व्हायरल व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. त्याचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो एक सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर बादशाहनंदेखील त्याच्यासोबत 'बचपन का प्यार' हे गाणं रेकॉर्ड केलं आहे. परंतु यानंतर आता रानू मंडलचाही बचपन का प्यार हे गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सेकर्ड अड्डा या नावानं असेलेल्या इन्स्टाग्रामवर पेजवर रानू मंडलचा हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये रानू मंडल बचपन का प्यार हे गाणं गाताना दिसत असून एक व्यक्ती तते रकॉर्ड करतचाना दिसत आहे. रानू मंडलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी तिचं हे गाणं पसंत केलं आहे तर काहींनी तिच्या गाण्यावरुन ट्रोलही केलं आहे.