Lakme Fasion Week 2019! ...अन् अनिल कपूर व रणवीर सिंगने रॅम्पवर धरला ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:00 PM2019-02-03T14:00:14+5:302019-02-03T14:03:10+5:30
मुंबईत सुरु असलेला ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे गाजतो आहे. कृती खरबंदा पासून भूमी पेडणेकर, कंगना राणौत अशा अनेकींनी हजेरी लावून या शोला ‘चार चांद’ लावलेत. काल रात्री अनिल कपूर, रणवीर सिंग, जान्हवी कपूर अशा स्टार्सनी रॅम्पवर आग लावली.

अनिल, रणवीर व जान्हवी यांनी डिझाईनर राघवेंद्र राठोर यांनी तयार केलेले कलेक्शनसाठी रॅम्पवॉक केला. पण हा रॅम्पवॉक यादगार ठरला तो रणवीर व अनिल यांच्यामुळे. होय, दोघांनीही रॅम्पवर असा काही ताल धरला की, सगळीकडेच उत्साह भरला. रॅम्पवॉक केल्यानंतर जान्हवी राघवेंद्रसोबत माघारी वळताच अनिल व रणवीर यांनी बॅकग्राऊंड म्युझिकवर ताल धरला. त्यांना रॅम्पवर असे नाचताना पाहून जान्हवीलाही आपले हसू रोखता आले नाही.
अनिल कपूर रॅम्पवर पोहोचताच रणवीरने त्यांना चीअरअप करणे सुरु केले. अनिल कपूरने स्टेजवर एन्ट्री घेताच रणवीर त्यांना चीअरअप करू लागला. हे पाहून अनिलने पुढे येत रणवीरला एक गोड ‘जादूची झप्पी’ दिली. तूर्तास अनिल व रणवीर यांच्या या धम्माल मस्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तुम्हीही पाहा आणि कसे वाटले ते आम्हाला जरूर कळवा.
गत शुक्रवारी अनिल कपूर यांचा ‘एक लडकी ने देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट रिलीज झाला. समीक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. सोनम कपूर, राजकुमार राव, जुही चावला या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. रणवीरचे म्हणाल तर रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.