लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:28 PM2024-11-08T13:28:31+5:302024-11-08T13:30:31+5:30

डिलिव्हरीनंतर दीपिका पहिल्यांदाच तिच्या लेकीबरोबर कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ranveer singh and deepika padukone spotted after daughter dua birth watch video | लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ

लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीच आई झाली आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला गोंडस बाळाला जन्म दिला. दीपिका आणि रणवीर यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. दिवाळीच्या मुहुर्तावर दीपिका-रणवीरने लाडक्या लेकीची छोटीशी झलक दाखवत तिच्या नावाबाबतही खुलासा केला. दीपिका-रणवीरने लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. डिलिव्हरीनंतर दीपिका पहिल्यांदाच तिच्या लेकीबरोबर कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

दीपिकाला तिच्या लेकीसोबत शुक्रवारी सकाळी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी तिच्यासोबत रणवीरही होता. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन दीपिकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दीपिका एअरपोर्टवर लेकीबरोबर दिसत आहे. डिलिव्हरीनंतर जवळपास महिन्याभराने दीपिकाला स्पॉट करण्यात आलं आहे. या व्हिडिओत दुआची झलकही पाहायला मिळत आहे. लेकीला घेऊन जाताना दीपिका दिसत आहे. 


दीपिका आणि रणवीरने लेकीचा फोटो शेअर करत तिच्या नावाचा अर्थ सांगितला होता. फोटो शेअर करताना जोडप्याने कॅप्शनमध्ये 'दुआ पादुकोण सिंग, 'दुआ': म्हणजे प्रार्थना..कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे. आमचे अंतःकरण प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर'असं लिहिलं होतं. 

२०१८ साली दीपिका आणि रणवीरने लग्न केलं होतं. लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेन सिनेमात दीपिका आणि रणवीरने एकत्र काम केलं आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दीपिका गरोदर होती. गरोदर असताना दीपिकाने सिनेमातील अॅक्शन सीन्स शूट केले होते. 

Web Title: ranveer singh and deepika padukone spotted after daughter dua birth watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.