'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 07:20 PM2019-04-26T19:20:55+5:302019-04-26T19:21:40+5:30

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने २०१९मध्ये 'गली बॉय' चित्रपटाने दमदार सुरूवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत होती.

Ranveer Singh and Joey Akhtar will come together once again after 'Gully Boy' | 'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र

'गली बॉय'नंतर रणवीर सिंग व जोया अख्तर पुन्हा एकदा येणार एकत्र

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने २०१९मध्ये 'गली बॉय' चित्रपटाने दमदार सुरूवात केली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले होते. झोया अख्तरने पुढील कथा व विषय शोधायला सुरूवात केली आहे. सत्य घटनेवर आधारीत चित्रपट बनवणारी झोया अख्तर यावेळी ड्रामा, मिस्ट्री व क्राईम जॉनरवर सिनेमा बनवण्याचा विचार करत आहे.

आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार, झोया अख्तर आगामी चित्रपटात दोन नायकांना घेणार आहे. त्यातील एक नायकाच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगची निवड ती करू शकते. तर दुसरा अभिनेता कोण असेल, हे अद्याप समजू शकलेले नाही.

झोयाचा हा सिनेमा गँगस्टरवर आधारीत असणार आहे. या चित्रपटासाठी ती हॉलिवूड गँगस्टर ड्रामा द डिपार्टेड आणि गँग्स ऑफ न्यूयॉर्क या चित्रपटाच्या रिमेकसाठी राईट्स घेण्याचा विचार करते आहे. या चित्रपटाची कथा मुंबईच्या पार्श्वभूमीवर असेल. 


जर या चित्रपटासाठी झोया अख्तर व रणवीर सिंग एकत्र आले तर हा त्यांचा तिसरा चित्रपट असेल. यापूर्वी त्या दोघांनी 'दिल धडकने दो' व 'गली बॉय' चित्रपटात एकत्र काम केलेले आहे.


सध्या रणवीर सिंग '८३' चित्रपटाच्या कामात बिझी आहे. नुकतेच त्याने या सिनेमातील संपूर्ण टीमसोबत धर्मशाला येथील ट्रेनिंग पूर्ण केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे. हा चित्रपट १० एप्रिल, २०२०ला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात रणवीर माजी क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि या भूमिकेसाठी रणवीर खूप मेहनत घेतो आहे.

Web Title: Ranveer Singh and Joey Akhtar will come together once again after 'Gully Boy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.