रणवीर सिंगला आहे ‘हा’ आजार, म्हणून झोपू शकतो 20 तास! खुद्द पत्नी दीपिकानेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 11:44 AM2020-04-12T11:44:45+5:302020-04-12T11:48:07+5:30
वाचा, रणवीरला कोणता आहे आजार?
दीपवीर अर्थात दीपिका पादुकोण व रणवीर सिंग हे चाहत्यांचे बॉलिवूडचे लाडके कपल सध्या लॉकडाऊनमुळे घरात कैद झालेय. पण हो, सोशल मीडियावर मात्र हे कपल चांगलेच अॅक्टिव्ह आहे. सध्या दीपिका व रणवीर दोघेही लॉकडाऊनमुळे घरी आहेत आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करण्यात बिझी आहेत. अशाच कमेंटच्या नादात रणवीर सिंगच्या एका आजाराचा खुलासा झाला आहे. होय, खुद्द दीपिका व रणवीरने हा खुलासा केला.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दीपिका कधी नव्हे इतकी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसतेय. ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका आजाराविषयी पोस्ट केली. विशेष म्हणजे, रणवीरनेही तिच्या या पोस्टवर कमेंट केली. मलाही हा आजार असल्याचे त्याने कमेंट करताना लिहिले.
दीपिकाने ज्या आजाराविषयी पोस्ट केली होती त्या आजाराचे नाव आहे हायपरसोमनिया. हायपरसोमनिया या आजाराची संपूर्ण माहिती देणारी एक पोस्ट दीपिकाने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केली होती. ‘हायपरसोमनिया काय आहे. ही एक अशी कंडीशन आहे ज्यात व्यक्ती 12-15 झोपूनही त्याला थकवा जाणवत राहतो,’ असे या पोस्टमध्ये लिहिले होते.
ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना, ‘ हा आजार तर ओळखीचा वाटतोय,’ असे दीपिकाने लिहिले होते. याशिवाय या पोस्टमध्ये तिने स्वत:ला आणि पती रणवीरला टॅग केले होते.
दीपिकाची नेमकी हीच पोस्ट रणवीरनेही शेअर केली आणि हा तर मी आहे, असे त्याने लिहिले़ एकंदर काय तर याच पोस्टने रणवीरला हायपरसोमनिया असल्याचे स्पष्ट झाले.
मध्यंतरी एका मुलाखतीत दीपिकाने रणवीर रणवीर 20 तास झोपू शकतो, असे सांगितले होते. कदाचित यामागे रणवीरचा हाच आजार कारणीभूत होता.