ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता, दिसला करण जोहरच्या ऑफिसच्या बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 05:58 PM2019-09-14T17:58:56+5:302019-09-14T18:06:07+5:30
हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. पण आता तो मुंबईत परतला आहे.
रणवीर सिंग त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखला जातो. त्याची अतरंगी फॅशन त्याच्या चाहत्यांना चांगलीच आवडते. रणवीर सिंगला नुकतेच मुंबईत करण जोहरच्या ऑफिसच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी त्याने घातलेल्या गुलाबी रंगाच्या जॅकेटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचसोबत त्याने कॅप आणि गॉगल देखील घातला होता. तसेच त्याच्या पायात भलेमोठे बूट दिसले. या आगळ्या वेगळ्या अंदाजात देखील तो उठून दिसत होता.
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंग त्याच्या 83 या आगामी चित्रीकरणाच्या शूटिंगमध्ये लंडनमध्ये बिझी होता. पण आता तो मुंबईत परतला असून त्याला करणच्या ऑफिसच्या बाहेर पाहाण्यात आले.
83 या चित्रपटामध्ये तो भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कपिल देव यांच्या भूमिकेसाठीही रणवीर प्रचंड मेहनत घेत आहे. एवढंच नाही तर या भूमिकेसाठी त्याने आपल्या आवडत्या अनेक गोष्टींचा त्यागही केला आहे.
रणवीरने लंडनमध्ये 83 मध्ये पहिले शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केल्याची माहिती इन्स्टाग्रामवरुन काही दिवसांपूर्वी दिली होती. या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.
या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.