एक्स-गर्लफ्रेंडचा आवाज वापरणं पडलं महागात, प्रसिद्ध रॅपरला द्यावे लागणार तब्बल 330 कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:55 AM2023-03-22T11:55:35+5:302023-03-22T11:57:14+5:30

सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. मग अगदी हॉलिवूड सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाही. हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध रॅपरचा एक ...

rapper bad bunny ex girlfriend sued him for rs 330 crore for using her voice without permission | एक्स-गर्लफ्रेंडचा आवाज वापरणं पडलं महागात, प्रसिद्ध रॅपरला द्यावे लागणार तब्बल 330 कोटी?

एक्स-गर्लफ्रेंडचा आवाज वापरणं पडलं महागात, प्रसिद्ध रॅपरला द्यावे लागणार तब्बल 330 कोटी?

googlenewsNext

सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. मग अगदी हॉलिवूडसेलिब्रिटीही त्याला अपवाद नाही. हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध रॅपरचा एक किस्सा सध्या प्रचंड व्हायरल होतोय. आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा आवाज काढणे त्याला महागात पडले आहे. नेमकं काय घडलंय वाचा.

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बैड बनीवर (Bad Bunny) त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केस केली असून तब्बल ४० मिलियन डॉलरची (330 कोटी) मागणी केली आहे. कार्लिज डी ला क्रूज(Carliz)  असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये ते वेगळे झाले. बैड बनीने त्याच्या दोन गाण्यांमध्ये कार्लिजची परवानगी न घेताच तिच्या आवाजाचा वापर केला आहे. 

रिपोर्ट्सनुसार, 'पा टी' (Pa Ti), 'डॉस मिल' या दोन गाण्यांमध्ये रॅपरने त्याच्या एक्सगर्लफ्रेंडचा आवाज वापरला आहे. ही दोन्ही गाणी लोकप्रिय आहेत. एका गाण्याला युट्युबवर 355 मिलियन व्ह्यूज आहेत तर दुसऱ्या गाण्याला 60 मिलियन व्ह्यूज आहेत. 

या दोन्ही गाण्यांचा वापर रेकॉर्डिंग्स, प्रमोशन आणि ग्लोबसल कॉन्सर्टसाठी केला जातो. यावर कार्लिजची परवानगी घेण्यात आली नव्हती. म्हणूनच तिने रॅपरवर केस केली आहे आणि भरपाई म्हणून 330 कोटींची मागणी केली आहे.

बैड बनी आणि कार्लिज यांच्या नात्याची सुरुवात 2011 मध्ये झाली होती. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दोघांनी सोबतच युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले आणि एका दुकानात कामही केले. पाच वर्ष डेट केल्यानंतर 2016 मध्ये दोघंही वेगळे झाले.

Web Title: rapper bad bunny ex girlfriend sued him for rs 330 crore for using her voice without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.