खूप वाईट, टीव्ही कलाकर म्हणून रिजेक्ट करतात, सिनेमांमध्ये काम मिळत नसल्याने रश्मी देसाईने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 04:09 PM2021-03-12T16:09:17+5:302021-03-12T16:19:16+5:30
वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
फक्त टीव्ही मालिका नाही तर रश्मी देसाईने काही प्रादेशिक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आहे, आज रश्मी टीव्हीवरील हायस्टपेड अभिनेत्रींपैकी एक आहे. टीव्ही व्यतिरिक्त, तिने भोजपूरी आणि बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु मोठ्या स्क्रीनवर ती तिला म्हणवं तसं यश मिळाले नाही.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार रश्मी देसाईने नुकत्याच दिलेल्या मुलाखती तिच्या मनातील खंत बोलून दाखवत एक टीव्ही अभिनेत्री म्हणून मला सिनेमांमध्ये काम दिलं जात नाही. या मुलाखतीत रश्मी देसाईने सांगितले की, मला वेगळी वागणूक दिली जाते ही तर एक टीव्ही अभिनेत्री आहे असे बोलून लोक खूप सहजपणे दुर्लक्ष करतात त्याचे मला वाईट वाटते. मी केलेले चांगले काम पाहिलं जात नाही. मी किती चांगले प्रोजेक्टस केले आहेत ते बघत नाहीत. ते आपल्या हिशोबाने मला वेगळं करुन टाकतात.
रश्मी देसाई पुढे म्हणाली, "नवीन लोक इंडस्ट्रीत येत असतात आणि त्यांचे स्वागत देखील केले जाते, मात्र आम्हाला 'टीव्ही कलाकार' म्हणत काम दिलं जातं नाही. ज्या लोकांचे वर्चस्व आहेत, त्याना चांगले प्रोजेक्ट मिळतात. हे चुकीचे आहे आणि मला ते आवडत नाही हे अपमानकारक आहे. आम्ही कलाकार आहोत आणि सर्व कलाकारांना सारखं काम मिळावे त्यांना अडवले जाऊ नये.
रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीबाबत सुद्धा बोलली. तिने सांगितले की टीव्ही इंडस्ट्रीमधील कलाकारच टीव्ही कलाकारांचा आदर करीत नाहीत. रश्मीच्या म्हणण्यानुसार, टीव्ही इंडस्ट्रीच्या लोकांना असे वाटते की टीव्ही कलाकारांना काहीच येत नाही. रश्मी देसाई आज छोट्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. केवळ वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं.'उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. हिंदी मालिकांसह रश्मीने भोजपुरी, असामी, गुजराती चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत.