सगळंच उध्वस्त झाल्यासारखे वाटत होते, तुटलेल्या नात्यांवर बोलताना ढसाढसा रडली रश्मी देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:22 PM2021-06-18T19:22:25+5:302021-06-18T19:26:47+5:30
२००२ मध्ये रश्मी देसाईने आपल्या करिअरची सुरुवात आसामी चित्रपटापासून केली. मात्र, चित्रपटात तिची भूमिका खूपच लहान असल्यामुळे ती लोकांच्या नजरेत येऊ शकली नाही. बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले.
लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळतात असे म्हणतात. पण काहीवेळा या जुळलेल्या गाठी शेवटपर्यंत टीकण्यासाठी नसतात. असेच काहीसे झाले आहे उतरन फेम अभिनेत्री रश्मी देसाईबरोबर. रश्मीची गणना टीव्ही विश्वात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.आपले करियर बनविण्यासाठी तिलाही प्रचंड मेहनत करावी लागली. २००२ मध्ये रश्मीने आपल्या करिअरची सुरुवात आसामी चित्रपटापासून केली. मात्र, चित्रपटात तिची भूमिका खूपच लहान असल्यामुळे ती लोकांच्या नजरेत येऊ शकली नाही.
बी ग्रेड चित्रपट ते बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले.टीव्ही मालिकांमध्ये तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. उतरन मालिकेत तपस्या या भूमिकेमुळे ती प्रकाझोतात आली. व्यावसायिक आयुष्यात यशस्वी ठरलेली रश्मी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचीही प्रेमात फसवणूक झाली, तिच्या तुटलेल्या नात्याबद्दल रश्मी पहिल्यांदाच उघडपणे बोलली.
रश्मीने तिचा को-स्टार नंदिश संधूशी फेब्रुवारी २०१२ मध्ये धौलपुरमध्ये लग्न केले. दोघे उतरन मालिकेत काम करत होते. सेटवरच दोघांमध्ये जास्त जवळीक वाढु लागली होती.दोघांमध्ये चांगली मैत्री झाली त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षातच दोघांमध्ये खटके उडू लागले. दोघांमधल्या वाढत्या वादामुळेच ते वेगळे राहू लागले. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.
नंदिश रश्मीला घेवून खूप पझेसिव्ह होता. नंदिशचा हाच स्वभाव रश्मीला आवडत नव्हता. मला असे जाणवले की मी या व्यक्तीसोबत माझे संपूर्ण आयुष्य काढू शकत नाही. मी नेहमीच माझ्या विचारांवर आणि कृतींवर ठाम राहिलेली आहे. याच कारणामुळे खटके उडायचे. दुसरीकडे नंदिशचे इतर मुलींबरोबरही मैत्री होती. रश्मीनेही दोघांचे नाते वाचवायचा पूर्ण प्रयत्न केला पण ती नात्यात अपयशी ठरली.
रश्मी म्हणाले माझे आयुष्य पूर्णपणे उध्वस्त झाल्यासारखे वाटु लागले होते, आता आयुष्यात काय करावे ते मला समजत नव्हते. पैसा प्रसिद्धी सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या त्यामुळे वाटत होते की, लोक केवळ त्याच गोष्टीमुळे माझ्याशी मैत्री करतात त्याचा फायदा घेतात.मात्र स्वतःला सावरत गेले आणि पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने आयुष्याकडे पाहायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा आयुष्य एन्जॉय करत असल्याचे तिने सांगितले.