रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं गुपचूप केलं लग्न? फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 06:57 PM2022-11-22T18:57:20+5:302022-11-22T18:57:56+5:30

Vijay Deverakonda And Rashmika Mandana : अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Rashmika Mandana and Vijay Deverakonda married secretly? The photos are going viral | रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं गुपचूप केलं लग्न? फोटो होतोय व्हायरल

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडानं गुपचूप केलं लग्न? फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या  होत्या. डिअर कॉम्रेड व गीता गोविंदम चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे आणि या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आता त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून त्या दोघांनी गुपचूप लग्न उरकला असल्याचं बोललं जातं आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोत रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा नववधू आणि वराच्या पोशाखात दिसत आहेत. तसेच लग्नात वर-वधू एकमेकांना घालतात तसे हारही त्यांच्या गळ्यात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ते खरंच लग्नबेडीत अडकले आहेत की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.


रश्मिका  आणि देवरकोंडाचा व्हायरल होत असलेला फोटो एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. परंतु, रश्मिका व देवरकोंडाने लग्न केलेलं नाही. तर हा व्हायरल होणारा फोटो त्यांच्या चाहत्यानेच फोटोशॉप केलेला आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोवर चाहत्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र लायगर फ्लॉप ठरल्यानंतर त्यांचे पॅचअप झाल्याची चर्चा रंगली होती.

Web Title: Rashmika Mandana and Vijay Deverakonda married secretly? The photos are going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.